Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

१५० महिलांच्या हाती ‘एसटी’चे स्टेअरिंग

Share

नाशिक ।  प्रतिनिधी

एसटी महामंडळाकडून ‘चालक-वाहक’ म्हणून केल्या जाणार्‍या भरतीत 150 महिलांची निवड झाली आहे. त्यांना ऑगस्ट महिन्यापासून एक वर्षांचे प्रशिक्षण होणार असून त्यानंतर या महिला महामंडळाच्या सेवेत दाखल होणार आहेत. त्यामुळे एसटी बसचे स्टेअरिंग आता महिलांच्या हाती जाणार आहे.

सध्या एसटी महामंडळाची भरती प्रक्रिया सुरु आहे. यात महिलांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त महिलांचा प्रतिसाद मिळावा यासाठी काही अटींमध्ये बदलही करण्यात आले आहेत. पुरुष व महिलांसाठी अवजड वाहन परवाना व तीन वर्षे वाहन चालवण्याचा अनुभव अशी अट यापूर्वी होती. मात्र अट शिथिल करून महिलांसाठी अवजडऐवजी हलकी वाहने चालवण्याचा एक वर्षांचा परवाना अशी अट ठेवण्यात आली.

त्यानुसार महिलांनी अर्ज केले. सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर चालक-वाहक पदासाठी 150 महिला पात्र ठरल्या आहेत. त्यांना अवजड वाहन चालवण्याचा अनुभव नसल्याने त्यांना नियमानुसार एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर त्या सेवेत दाखल होतील. या महिला चालकांना प्रथम छोट्या अंतरावरील एसटी चालवण्याचा अनुभव दिला जाईल. त्यानंतर लांब पल्ल्याच्या मार्गावर त्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!