Saturday, April 27, 2024
HomeनाशिकVideo : शेतकऱ्यांच्या माध्यमातून जवळपास १५ टन भाजीपाल्याची शहरात विक्री

Video : शेतकऱ्यांच्या माध्यमातून जवळपास १५ टन भाजीपाल्याची शहरात विक्री

नाशिक | प्रतिनिधी 

कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी सध्या नाशिक शहरात सध्या संचारबंदी सूरु आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरु आहेत. भाजीपाल्याची विक्री सुरु करण्यात आली आहे. ग्राहकांनी आपल्या घराजवळ असलेल्या दुकानांत सोशल डीटन्सी पाळत भाजीपाला खरेदी करावयाचा आहे. शहरात शेतकऱ्यांना आपला भाजीपाला विक्रीसाठी शहरातील विविध ठिकाणी मुभा देण्यात आली आहे. यामाध्यमातून काल (दि. ३१) दिवसभरात जवळपास १५ टन भाजीपाल्याची विक्री यामाध्यमातून झाली असल्याची माहिती महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली. ते आज सकाळी संकट सोबती उपक्रमांतर्गत शहरातील नागरिकांशी बोलत होते.

- Advertisement -

ते म्हणाले, जीवनावश्यक वस्तूंचा पूरवठा सुरळीत पार पडावा यासाठी शहरात गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, अनेकजन अजूनही शहरात दिसून येतात. मेडिकल, किरणाचे नाव सांगत अनेकांनी शहरात गरज नसताना शिरकाव केलेला दिसतो. पोलीस यंत्रणा अशा नागरिकांवर कारवाई करत आहे.

नाशिककरांना सोयीस्कर व्हावे यासाठी महापालिकेने भाजीपाला मार्केट सुरु केले. सुरक्षित अंतर ठेवून ग्राहकांनी वस्तू खरेदी करायच्या आहेत. शेतकऱ्यांना आपला माल   शहरात विक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे, याठिकाणी शेतकरी शेतातला ताजा माल विक्रीसाठी आणत आहेत.

या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी १५ टन भाजीपाल्याची विक्री झाली आहे. त्यामुळे आपल्या घराच्या अजुबाजुला अगदी जवळ भाजीपाला मिळू शकतो अशी व्यवस्था नाशिकरांसाठी करून दिली आहे. तरी अनावश्यक गर्दी न करण्याचे आवाहन आयुक्त गमे यांनी केले आहे.

शहरात विविध संघटनांच्या, संस्थांच्या माध्यमातून घरपोच भाजीपाला दिला जात आहे. त्यामुळे ज्यांना घराबाहेर पडता येणे शक्य नाही त्यांनाही या योजनेचा फायदा झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या