Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सकाळी अकरा वाजेपर्यंत नाशिक जिल्ह्यात १५ टक्के मतदान

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर आज सकाळी सात वाजेपासून मतदानास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. सकाळी मतदार याद्यांचा गोंधळ, सिन्नर तालुक्यातील ईव्हीएम मशीनची बिघाड वगळता जवळपास जिल्ह्यातील सर्वात मतदान केंद्रांवर शांततेत मतदान सुरु आहे. पहिल्या एक तासांत गर्दी झालेली नव्हती मात्र, आठ वाजेपासून नागरिक मतदानासाठी बाहेर पडले. ताज्या आकडेवारीनुसार सकाळी ११ वाजेपर्यंत १४.९५ टक्के मतदान संपूर्ण जिल्ह्यात झाले आहे.

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या कार्यालयात केंद्रीय वॉर रूममध्ये साडेचारशे पेक्षा अधिक मतदान केंद्रांवर लक्ष ठेवले जात आहे. ज्या ठिकाणी अडचणी आल्या तिथे तात्काळ सूचना करून सोडविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

सकाळी अकरा वाजेपर्यंत झालेले एकूण मतदान 

113 Nandgaon =10%
114 malegaon (C) =21.06%
115 Malegaon (O) =14.23%
116 Baglan= 11.64%
117 Kalwan =25.87%
118 Chandwad=17.3%
119 Yeola =14.7%
120 Sinnar= 14.54%
121 Niphad=17.2%
122 Dindori =22.07%
123 Nashik (E)=11.65%
124 Nashik (C)=10.6%
125 Nashik (W)=11.59%
126 Deolali =8.57%
127 Igatpuri=15.4%

Dist. 14.92%

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!