Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

लासलगाव-चांदवड बसला वाळकेवाडी फाट्याजवळ अपघात; १५ ते २० प्रवासी जखमी

Share

लासलगाव | वार्ताहर

लासलगाव ते उर्धुळ मार्गे चांदवड जाणाऱ्या  बसला वाळकेवाडी फाट्याजवळ अपघात झाला. अपघातात १५ ते २० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.

आज दुपारी साडेबारा वाजता लासलगाव बस स्थानकावरून बस उर्धुळ मार्गे चांदवडकडे प्रयाण करत होती. यावेळी या बस क्रमांक एमएच12 सी एस 7578 या बसला वाळकेवाडी फाट्यावर  मुरमाड जागेवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.

या अपघातात बस रस्त्याच्या कडेला असलेल्या लहान नालीत उलटली. अपघाताची माहीती मिळताच आगारप्रमुख एस एन. शेळके कर्मचारी व अतिरिक्त बससह अपघातस्थळी पोहचले व प्रवासी तातडीने दुसर्या बसमध्ये बसवुन त्यांनी चांदवड येथे रवाना केले. जखमी प्रवाशांवर प्राथमिक उपचार करण्यासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!