खासदार सुप्रिया ताईंच्या संपत्तीत वाढ; ५१ कोटीवरून ११३ कोटी

0
“वावर हाय तर पावर हाय”; ६१ कोटी केवळ ५ वर्षात
नवी दिल्ली : सामान्य नागरिकांना ‘अच्छे दिन’ येतील कि नाही याबाबत सांगू नाही शकत परंतु जनतेचे सेवा करणारे जनसेवक लोकप्रतिनिधी असलेल्या खासदारांना मात्र अच्छे दिन आल्याचे समोर आले आहे. कारण सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा निवडून आलेल्या 153 खासदारांच्या संपत्तीत 142 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामध्ये अभिनेते खासदार शत्रुघ्न सिन्हा, पिनाकी मिश्रा आणि सुप्रिया सुळे हे टॉपर ठरले आहेत.

यामध्ये आकडेवारी नुसार शत्रुघ्न सिन्हा यांची संपत्ती सर्वात जलद गतीने वाढली आहे. सन 2009 मध्ये शत्रुघ्न सिन्हा यांची संपत्ती सुमारे 15 कोटी रुपये इतकी होती. सन 2014 मध्ये त्या संपत्तीत वाढ होऊन ती 131 कोटी रुपयांवर गेली. या खासदारांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

2009 मध्ये त्यांची संपत्ती 51 कोटी रुपये होती, ही संपत्ती 2014 मध्ये वाढून 113 कोटी रुपये झाली आहे. तर बीजू जनता दलाच्या (बीजेडी) पिनाकी मिश्रा यांची यांची संपत्ती 107 कोटींची होती. त्यात वाढ होत ती 137 कोटींवर पोहोचली आहे.

संपत्तीत सर्वाधिक वाढ होणाऱ्या पहिल्या दहा खासदारांमध्ये अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल सहाव्या स्थानी, तर वरुण गांधी 10व्या स्थानी आहेत. इलेक्शन वॉच अँड असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर)च्या सर्व्हेमध्ये ही माहिती समोर आली आहे.

१० एकराचे उत्पादन ६१ कोटी
सुप्रियाताई सुळे बारामती मतदार संघातून निवडणूक लढवतात. त्यांचा मूळ व्यवसाय शेती दाखवलेला आहे. त्यांचेकडे फक्त १० एकर शेती असूनही त्यांनी यामध्ये तब्बल ११३ कोटी रुपये कमावले. याच शेतीमधील उत्पादन २००९ च्या निवडणुकीमध्ये दाखवले होते ५२ कोटी रुपये, मात्र २०१४ ला ते तब्बल ११३ कोटी झाले, म्हणजे ६१ कोटी केवळ ५ वर्षात १० एकरात कमावले. “वावर हाय तर पावर हाय” जणू हा शब्द खरा ठरू लागला आहे, असे वाटू लागले आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात शेतकरी कर्जबाजारी होवून आत्महत्या करत आहेत.

LEAVE A REPLY

*