Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनाशिक @९५०; दिवसभरात १४ रुग्णांची भर; दोघे दगावले; शहरातील १२ तर येवला...

नाशिक @९५०; दिवसभरात १४ रुग्णांची भर; दोघे दगावले; शहरातील १२ तर येवला व मनमाडमधील प्रत्येकी एक रुग्ण

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरात करोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सध्या नाशिकने मालेगावला मागे टाकल्याचे गेल्या चार दिवसातील चित्र आहे. शहरासह आज जिल्ह्याच्या विविध भागातील 14 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.

- Advertisement -

यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत करोना ग्रस्तांची संख्या 950 वर पोहचली आहे. तर आज दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक येथील एकाचा समावेश आहे. तर दुसरा रुग्ण संगमनेर तालुक्यातील निमोन येथील रहिवासी आहे.  यामुळे करोनाबळींची संख्या ५३ वर पोहोचली आहे. दरम्यान, दिवसभरात 48 रूग्णही करोना मुक्त झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

आज दिवसभरात जिल्ह्यातील 66 अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 52 निगेटिव्ह तर 14 पॉझिटिव्ह आढळले. यात नाशिक शहरातील 12 जणांचा समावेश आहे. शहरातील वडाळा येथील 5, कॉलेजरोड येथील दोन महिला व लेखानगर येथील 3 बालकांचा समावेश आहे. अनुक्रमे 2 व 8 वर्षाच्या मूली व 10 वर्षीय मुलाचा यात समावेश आहे.

यामुळे नाशिकशहराचा आकडा 88 वर पोहचला आहे. मृत्यू झालेली व्यक्ती नाशिक येथील एका पोलीस सेवकाचे वडिल आहेत. जे संगमनेर येथून उपचारासाठी नाशिकमध्ये दाखल झाले होते.

जिल्ह्यात मालेगाव, नाशिकसह नव्या विविध तालुक्यांतील नव्या गावात तसेच शहरातील विविध उपनगरांमध्ये करोनाचे नवे रूग्ण आढळून येत आहेत. आज आलेल्या ग्रामिण भागातील 2 अहवालात येवला व मनमाड येथील 2 रूग्ण आढळून आले आहेत. तर आज दिवसभरात जिल्ह्यात 158 नवे संशयित रूग्ण दाखल झाले आहेत.

यात मालेगाव मनपा हद्दीतील 12, ग्रामिण भागात 129 तर जिल्हा रूग्णालयात 6, ग्रामिण रूग्णायात 6 रूग्ण दाखल आहेत. तसेच आज दिवसभरात 48 करोनाग्रस्त रूग्ण करोनामुक्त झाले असून त्यांना रूग्णालयातून मुक्त करण्यात आले आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 720 वर पोहचला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आजपर्यंत 43 हजार 769 संशयित रूग्णांचे स्क्रीनींग करण्यात आले आहे. जिल्ह्यातून आजपर्यंत 9 हजार 778 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यातील 8 हजार 493 निगेटिव्ह, 950 पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 168 रूग्ण उपचार घेत आहेत. तर अद्याप 347 अहवाल प्रलबिंत आहेत. तर आज नव्याने 158 संशयित रूग्ण दाखल झाले आहेत.

ग्रामिण भागातील करोनाग्रस्त असे

  • नाशिक ता. :  9
  • मालेगाव ता. : 21
  • चांदवड : 6
  • सिन्नर : 12
  • दिंडोरी : 9
  • निफाड : 19
  • नांदगाव : 13
  • येवला : 35
  • सटाणा : 2
  • कळवण : 1
    एकुण : 127

मृत्यू झालेले रूग्ण असे

  • एकुण : 51
  • नाशिक : 4
  • मालेगाव : 45
  • ग्रामिण : 1
  • जिल्हा बाह्य  : 1

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

  • एकूण कोरोना बाधित: 950
  • मालेगाव : 701
  • नाशिक : 88
  • उर्वरित जिल्हा : 127
  • जिल्हा बाह्य : 39
  • एकूण मृत्यू : 51
  • कोरोनमुक्त : 720
- Advertisment -

ताज्या बातम्या