नाशिक शहरात करोना बाधितांची संख्या १३८ वर ; संशयितांचा आकडा २०० वर

नाशिक शहरात करोना बाधितांची संख्या १३८ वर ; संशयितांचा आकडा २०० वर

प्रतिबंधीत क्षेत्र झाले २६ ; प्रलंबित नुमन्याचा आकडा वाढला

नाशिक | दि.२८ प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिका क्षेत्रात करोना रुग्णांचा आकडा वेगात वाढत असुन मंगळवारी (दि.२६) रोजी शहरातील रुग्णांचा आकडा १२९ इतका असतांना यात ९ नवीन रुग्णांची भर पडली आहे. ज्या प्रमाणात रुग्ण वाढत आहे, त्यांच्या संपर्कातील व्यक्तीची संख्या वाढत आहे. तसेच संशयित रुग्णांचा आकडा वाढत असुन २१२ जणांना उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. बाहेर गावावरुन शहरात दाखल होणार्‍या व्यक्ती करोना बाधीत आढळून आल्याने आता अशा व्यक्तीवर महापालिका प्रशासनाकडुन नजर ठेवली जात आहे.
मंगळवारी शहरात १२ संशयितांना करोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एकुण रुग्णाचा आकडा १२८ इतका झाला होता. यानंतर ९ नवीन रुग्ण आढळून आले होते. यामुळे बाधीतांंचा आकडा १३८ पर्यत गेला होता. या नवीन रुग्णांत रामनगर पेठरोड येथील बाधीत मृत व्यक्तीच्या संपर्कातील राहुलवाडीतील २१ वर्षीय युवक, पंचवटीतील हॉटेल चालकांच्या संपर्कातील २७ व ४० वर्षीय व्यक्ती, मुंबईहून आलेले दत्तमंदिर नाशिकरोड १७ व ३६ वर्षीय महिला, पीपीई किट विक्रीच्या निमित्ताने मुंबई – ठाणे येथे ये जा करणारी दिपालीनगर (नवीन नाशिक) येथील ३२ वर्षीय व्यक्ती, आयटी पार्क वडाळा येथील ३८ वर्षीय व्यक्ती, रासबिहारी शाळेसमोर ४८ वर्षीय महिला व दिंडोरीनाका परिसरातील ७० वर्षीय व्यक्ती यांचा समावेश आहे. अशाप्रकारे शहरातील बाधीत रुग्णांचा आकडा १३८ इतका झाला आहे.
दरम्यान, शहरात आजपर्यत करोना बाधीत भागातून आलेल्याची संख्या २४०० झाली असुन यातील ९४५ जणांचा देखरेखीखालील १४ दिवसाचा कालावधी पुर्ण झाला आहे. आत्तापर्यत शहरातील रुग्णालयात २५८३ संशयितांना दाखल करण्यात आल्यानंतर उपचार झाल्यानंतर २४१९ जणांना घरी सोडण्यात आले.
६ एप्रिल ते २७ मे २०२० या कालावधीत शहरात १३८ रुग्ण आढळून आले असुन ते  राहत असलेल्या घराजवळील परिसर असे एकुण ५३ भाग आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन जाहीर केले होते. यातील २७ प्रतिबंधीत क्षेत्रात नव्याने करोना रुग्ण आढळून न आल्याने याठिकाणचे निर्बंध पुर्णपणे हटविण्यात आले आहे.
नाशिक मनपा क्षेत्र स्थिती…(२७ मेपर्यत)
* एकुण पॉझिटीव्ह – १३८
* पुर्ण बरे झालेले – ४४
* मृत्यु – ८
* उपचार घेत असलेले – ३९५
* प्रलंबीत अहवाल – २१४
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com