Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

130 शिक्षकांच्या बदल्यांवर हरकती

Share

सोमवारी सुनावणी : महिनाभराच्या उशिराने मुहूर्त

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील 130 शिक्षकांनी बदली प्रक्रियेवर हरकती नोंदविल्या आहेत. या हरकतींवर सोमवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात सुनावणी होणार आहे़ बदली प्रक्रियेवर आक्षेप असणार्‍यांच्या तक्रारींवर एका महिन्यांत सुनावणी घेऊन निपटारा करावा, असा आदेश असताना दोन महिन्यांनंतर या सुनावणीला मुहूर्त सापडला आहे.

जून महिन्यांत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या़ गैरसोेयीच्या बदल्या झाल्यामुळे अनेक शिक्षक नाराज झाले होते़ तर काही शिक्षकांनी ऑनलाईनवर भरलेल्या शाळांच्या नावापैकी एकही शाळा मिळाली नव्हती़ एका शाळेवर दोघांच्या बदल्या झाल्याचेही प्रकार घडले होते़ शाळांचा ऑनलाईन अर्ज भरताना जेथे जागा आहेत, अशाच शाळा दिसणे आवश्यक होते़ मात्र, तेथे सर्वच शाळांची यादी येत होती़ त्यामुळे ज्या शाळेवर रिक्त जागाच नाही, अशा शाळांचे अर्ज भरण्यात आले़ त्यामुळे रिक्त शाळा न मिळाल्यामुळे शिक्षकांना समायोजनामध्ये दूरच्या शाळेवर जावे लागले़ यातून काही शिक्षकांच्या गैरसोयी झाल्या़ त्यामुळे शिक्षण विभागाने केलेल्या बदलीप्रक्रियेवर अनेक शिक्षकांनी हरकती नोंदविल्या आहेत़.

बदली झाल्यानंतर 7 दिवसांत हरकती घेऊन त्यावर एका महिन्यात सुनावणी घेण्यात यावी, असा आदेश सरकारने बजावला होता़ मात्र, बदली प्रक्रिया होऊन 2 महिने झाले तरी शिक्षकांच्या तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली नव्हती़ आता 21 ऑगस्ट रोजी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी तक्रारदार शिक्षकांच्या अर्जावर सोमवारी (द़ि26) सुनावणी घेण्यात येणार असल्याचे कळविले आहे़ सोमवारी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात तक्रारदार शिक्षकांनी विहित कागदपत्रांसह सुनावणीस उपस्थित राहण्याच्या सूचना काठमोरे यांनी केल्या आहेत़.

शिक्षकांच्या बदल्यांवरून सर्वाधिक कर्जत-जामखेड मतदारसंघातील सर्वाधिक 31 शिक्षकांनी बदल्यांबाबत तक्रारी केल्या आहेत़ त्याखालोखाल अकोले तालुक्यातून 28, पारनेरमधून 9, राहात्यातून 2 , शेवगावमधून 6, नगर तालुक्यातून 8, कोपरगावमधून 13, पाथर्डीमधून 6, राहुरीतून 1, श्रीगोंद्यातून 7, नेवासातून 10, संगमनेरमधून 2 अशा 123 शिक्षकांनी बदल्यांबाबत तक्रारी केल्या आहेत़ यात आणखी 7 शिक्षकांची भर पडली असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!