Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : होळकर पुलाखालून २१ हजार क्युसेस विसर्ग; गंगापूरमधून हंगामातील सर्वाधिक विसर्ग

Share

नाशिक | प्रतिनिधी 

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. संततधार पावसामुळे गंगापूर धरणातून हंगामातील सर्वात जास्त पाण्याचा विसर्ग आज केला जात आहे. गंगापूर धरण ८७ टक्के भरले असून १३ हजर ०२३ क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्याने आज सकाळी विसर्ग वाढविण्यात आला आहे. नदीकाठी नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

गेल्या आठवडेभरापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरणाची टक्केवारी वाढून ८५ च्या पुढे गेली. त्यानंतर हळूहळू विसर्ग करण्यात आला होता. दरम्यान, पावसाचा जोर ओसरला नसल्यामुळे विसर्ग आज सकाळी वाढविण्यात आला आहे.

नदीकाठी आपत्ती व्यवस्थापन, शहर तसेच ग्रामीण पोलीस यांच्यासह महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची गस्त आहे. वेळोवेळी सूचना नदीकाठच्या रहिवाशांना दिल्या जात आहेत.

गंगापूर धरणातून करण्यात आलेल्या विसर्गामुळे गोदाकाठच्या लहान-मोठी मंदिरे पाण्याखाली गेले आहेत. कपालेश्वर मंदिराच्या पायरयाजवळ गुडघाभर पाणी आहे. सर्व विधी इतरत्र होत आहेत. दुतोंडया मारुतीच्या मानेला पाणी लागले आहे. शहरात अधूनमधून पावसाची हजेरी कायम आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!