Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

उद्या बारावीचा निकाल; दुपारी एक वाजता बघता येणार निकाल

Share

पुणे : प्रतिनिधी

आयसीएसई आणि सीबीएसई बोर्डाचे निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा १२ विचा निकालही उद्या जाहीर होणार असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.

त्यामुळे उद्या दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल बघता येईल. निकालाची झेरॉक्स प्रतदेखील विद्यार्थ्यांना काढता येणार आहे.

निकालानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहेत. गुणपडताळणी २९ मे ते ७ जून या कालावधीत करता येणार आहे. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी २९ मे ते १७ जून पर्यंत अर्ज करता येईल. पुरवणी परीक्षा मागील वर्षीप्रमाणेच जुलै-ऑगस्टमध्ये होणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.

दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होणारे निकाल कधी लागतील यावर सोशल तर्क वितर्क लढवले जात होते मात्र बोर्डाच्या अधिकृत माहितीनंतर या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

राज्यातील नऊ विभागांमध्ये मंडळातर्फे 21 फेब्रुवारी ते 20 मार्चदरम्यान इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आली. यंदा जवळपास 14 लाख 91 हजार 306 विद्यार्थ्यांनी राज्यातील 2 हजार 957 केंद्रांवर परिक्षा दिली आहे.

नऊ विभागीय मंडळांपैकी नाशिक आणि औरंगाबाद विभागीय मंडळांकडून निकालाबाबतचे काम संथ सुरु होते त्यामुळे तारखेची निश्चिती होत नव्हती.

दरम्यान, राज्य शिक्षण मंडळ आणि चारही विभागांची एकत्रित बैठक आज पार पडली. त्यानंतर आढावा घेण्यात आला. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज निकालाची तारीख जाहीर करण्यात आली.

इथे पहा निकाल

www.mahresult.nic.in

www.hscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com 

तसेच  Bsnl मोबाइल ऑपरेटरद्वारे ५७७६६ या क्रमांकावर MHHSC <space> <seat no.> या फॉरमॅटमध्ये एसएमएस पाठवून निकाल मिळवता येईल.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!