Type to search

Breaking News Featured maharashtra नाशिक मुख्य बातम्या

बारावी निकाल : नाशिक ८४.१६, जळगाव ८६.६१, धुळे ८३.५२ व नंदुरबार ८३.८२ टक्के निकाल

Share

नाशिक | प्रतिनिधी 

इयत्ता १२ वीचा नाशिक विभागाचा निकाल ८४.७७ टक्के तर जिल्ह्याचा निकाल ८४.१६ इतका निकाल लागला आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा अधिक असून मुळीच यंदा हुश्शार ठरल्या आहेत. विभागातून १ लाख ५९ हजार ८९७ परीक्षार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी १ लाख ३५ हजार ५५०  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

ऑनलाईन निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची सोय शिक्षण मंडळाकडून करून देण्यात आली आहे.अशी माहिती विभागीय सचिव नितीन उपासनी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. दुपारी एक वाजेपासून मुलांना बैठक क्रमांक आणि आईचे नाव टाकून निकाल बघण्यास मिळाला. यासाठी मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या संकेतस्थळांवर निकाल पाहण्यासाठी गर्दी झाल्याने काहीसे सर्व्हर डाऊन झाल्याचा अनुभवदेखील काही ठिकाणी आला.

भ्रमणध्वनी वर निकाल बघण्यासाठी अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला. यावेळी निकालाची प्रतही मुलांनी काढून घेतली. पुढील आठवड्यात मुलांना शाळेतून निकालपत्रक मिळेल असे सांगण्यात आले असले तरी अद्याप तारीख निश्चित केलेली नाही.

नाशिक जिल्ह्याचा निकाल ८४.१६ टक्के इतका लागला. एकूण ४१७ कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी ९० केंद्रांवर ही परीक्षा दिली.या परीक्षेसाठी ७० हजार ९१६ विद्यार्थांनी नोंदणी केली होती. त्यापैंकी ७० हजार ८४५ विद्यार्थी प्रविष्ठ ठरले त्यातून  ५९ हजार ६२३ विद्यार्थी  उत्तीर्ण झाले.

धुळे जिल्ह्याचा निकाल ८३.५२  टक्के इतका निकाल लागला. २०० कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ४४ केंद्रावर परीक्षा दिली. २४ हजार २३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली यापैंकी २४ हजार १९३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यामध्ये २० हजार २०५  विद्यार्थी  उत्तीर्ण झाले.

जळगाव जिल्ह्याचा ८६.६१ टक्के निकाल लागला. २८८ कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी  ७१ परीक्षा केंद्रांवर परीक्षा दिली. ४८  हजार ६९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैंकी ४८  हजर ६१८ विद्यार्थी  प्रविष्ठ झाले त्यातून ४२ हजार १०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

नंदुरबार जिल्ह्याचा निकाल ८३.८२ टक्के लागला. ११२ कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी २३ केंद्रांवर परीक्षा दिली. या परीक्षेसाठी १६ हजार २७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैंकी १६ हजार २४१ विद्यार्थी  प्रविष्ठ झाले. त्यापैंकी १३ हजार ६१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

निकालाचा टक्का घसरला 

नाशिक विभागाचा निकाल ८४.७७ टक्के इतका लागला. १०१७  कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी २२८ केंद्रांवर परीक्षा दिली होती. यात ०१ लाख ६० हजार ११६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैंकी १ लाख ५९ हजार ८९७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यातून १ लाख ३५ हजार ५५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या दोन वर्षांपासून नाशिक विभागाचा निकालाचा आलेख घसरता असून यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत १.३६ टक्क्यांनी घट आली आहे. मार्च २०१७ मध्ये ८८.२२ टक्के, सन २०१८ मध्ये ८६.१३ टक्के निकाल लागला होता.

मुलींची टक्केवारी 

२०१९ मध्ये ६९ हजार ६०३ मुलींपैकी ६१ हजार ९९ मुली उत्तीर्ण झाल्या असून उत्तीर्णतेचे प्रमाण ८७.७८ टक्के इतके आहे. तुलनेने मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण याही वर्षी कमीच राहिले. यावर्षी ७७.९२ टक्के मुले उत्तीर्ण झाली. नाशिक जिल्ह्यातही मुलींनीच बाजी मारली असून जिल्ह्यात ४२ हजार ८९३ मुलांपैकी ३२ हजार ५०८ (७५.८९ टक्के) मुले उत्तीर्ण झाली आहेत. जिल्ह्यातून ३१ हजार ७२८ मुलीपैकी  २८ हजार ९  (८८.२८ टक्के) मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

सायबर कॅफेमध्ये उडाली धांदल 

शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या तीन संकेतस्थळांवर निकाल बघता येईल असे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळांवर भेट दिली खरी मात्र त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. भ्रमणध्वनीवर तर निकाल जाहीर झाल्याच्या अर्धा ते एक तास सर्व्हर डाऊन असल्याचाच अनुभव आला. यामुळे निकालाची उत्सुकता असलेल्या विद्यार्थ्यांची ‘सर्व्हर डाऊन’ने पुरती धांदल उडवली होती.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!