Type to search

Breaking News Featured maharashtra नाशिक मुख्य बातम्या

बारावी निकाल : यंदाही मुलीच हुश्शार! नाशिक विभागाचा ८४.७७ टक्के निकाल

Share

पुणे | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल आज ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला आहे. दुपारी एक वाजेनंतर बोर्डाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल बघता येईल.

सकाळपासूनच विद्यार्थ्यांची उत्सुकता गगनाला भिडली असून दुपारी एक केव्हा वाजतील, केव्हा निकाल बघू असे विद्यार्थ्यांना झाले आहे.

यंदा बारावी बोर्डाचा ८५.८८ टक्के इतका निकाल लागला आहे. विशेष म्हणजे, सालाबादप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण तब्बल ७.८५ टक्क्यांनी अधिक आहे. आज दुपारी मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे आणि सचिव डॉ. अशोक भोसले यांनी निकालाबाबतची माहिती दिली आहे.

यावेळी सांगण्यात आले की,  राज्यातील तब्बल ४ हजार ४७० विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. यंदा १२ वीच्या परीक्षेला राज्यभरात एकूण १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या ८ लाख ४२ हजार ९१९ तर विद्यार्थिनींची संख्या ६ लाख ४८ हजार १५१ इतकी होती.

कोकणची बाजी

यंदाच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली असून कोकणचा निकाल ९३. २३ टक्के इतका लागला,  पुणे विभागाचा निकाल ८७.८८ टक्के, अमरावती विभागाचा ८७.५५ टक्के, कोल्हापूर विभागाचा ८७.१२ टक्के, लातूर विभागाचा ८६.०८ टक्के, नाशिक विभागाचा ८४.७७ टक्के, मुंबई विभागाचा ८३. ८५ टक्के, तर नागपूर विभागाचा शाखेनुसार विज्ञान शाखेचा निकाल ९२. ६० टक्के, वाणिज्य शाखेचा ८८. २८ टक्के आणि कला शाखेचा निकाल ७५.४५ टक्के लागला असल्याचे समजते.

इथे पाहा निकाल

www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!