Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातील 1,206 पोलिस करोनाग्रस्त

राज्यातील 1,206 पोलिस करोनाग्रस्त

सार्वमत

मुंबई – राज्यात करोनाबाधित पोलिसांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 66 पोलिसांचा करोना अहवाल पॉसिटीव्ह आला आहे. त्यामुळे आता राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या 1,206 इतकी झाली आहे. यात अनेक पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

- Advertisement -

सध्या राज्यात 912 पोलिसांवर उपचार सुरु आहे. तर 283 पोलिसांनी करोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर दुरदैवाने 9 पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

करोनाची लक्षण असणार्‍या पोलिसांची संख्या मोठी आहे. आतापर्यंत 125 अधिकारी आणि 1081 पोलिस कर्मचारी अशा एकूण 1,206 पोलिसांचा करोनाची लागण झाली आहे. यात 90 पोलिस अधिकारी आणि 822 पोलिस कर्मचार्‍यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 34 अधिकारी आणि 249 पोलिस कर्मचारी बरे होऊन घरी परतले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या