Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगर जिल्ह्याचा बारावीचा 88 टक्के निकाल

Share

नगर शहराचा 89 टक्के निकाल

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज (मंगळवारी) जाहीर झाला. या निकालात नगर जिल्ह्यात मुलांपेक्षा मुलीच वरचढ ठरल्या. 93 टक्के मुली, तर 84 टक्के मुलांनी परीक्षेत घवघवीत यश मिळविले. नगर शहराचा निकाल 89 टक्के लागला. पुणे बोर्डाचा एकूण निकाल 85 टक्के लागला. बोर्डाच्या निकालातही मुलांपेक्षा मुलींचे पास होण्याचे प्रमाण 8 टक्क्यांनी वाढले. एकूणच निकालाची आकडेवारी पाहता नेहमीप्रमाणे पोरीच डोकेबाज असल्याचे स्पष्ट झाले.

नगर जिल्ह्यातील 36 हजार 818 मुले आणि 25 हजार 522 मुली अशा एकूण 62 हजार 340 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. निकालात 31 हजार 39 मुलं (84.30 टक्के) आणि 23 हजार 863 मुली (93.50 टक्के) अशा एकूण 54 हजार 902 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण होत महत्त्वाचा टप्पा पार केला. नगर शहरातील 9 हजार 940 विद्यार्थ्यांपैकी 8 हजार 886 विद्यार्थी पास झाले. शहराचा निकाल 89.06 इतका लागला.

शहरातील 10 कॉलेज 100 नंबरी
श्री समर्थ विद्या मंदिर (सावेडी), रामकृष्ण एज्युकेशन फांऊडेशन, श्री समर्थ ज्युनिअर कॉलेज (गुंडेगाव), इन्फोटेेक ज्युनिअर कॉलेज, पी. ए. इनामदार कॉलेज, श्री कासार पाटील आर्टस कॉमर्स कॉलेज (वाळकी), ऑक्झिलियम ज्युनिअर कॉलेज, सावेडी.

जिल्ह्याचा निकाल

विज्ञान शाखा 96.23 टक्के

वाणिज्य शाखा 92.09 टक्के

कला शाखा 74.04 टक्के

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!