Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

डोंगरीत इमारत कोसळली; १२ रहिवाशी ठार, ४० ते ५० जण दबल्याची भीती

Share

मुंबई | प्रतिनिधी 

डोंगरी येथे तांडेल स्ट्रीटवरील केसरबाई इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १२ रहिवाशांचा दुर्दैवी अंत झाला झाला. अजूनही इमारतीखाली ४० ते ५० रहिवासी दाबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. या घटनेत १२ जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला प्रशासनाकडून दुजोरा देण्यात आला आहे.

डोंगरीच्या तांडेल स्ट्रीटवरील अब्दूल हमीद दर्गा येथील केसरबाई इमारत आहे.  ही इमारत चार मजली असून सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी इमारतीचा काही भाग कोसळला.

या घटनेत १२ रहिवाशांचा मृत्यू झाला तर इमारतीखाली ४० ते ५० रहिवासी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.


घटनास्थळी मातीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू असून जखमींना आणि मृतदेहांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. इमारतीपर्यंत जायला अरुंद रस्ता असल्यामुळे मदतकार्यास अडथला निर्माण होत आहे. ही इमारत  म्हाडाची असून धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली होती अशी माहिती प्रतिनिधीकडून मिळते आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!