Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या सार्वमत

पूरग्रस्तांसाठी शिर्डी संस्थानकडून बारा कोटी

Share

शिर्डी (प्रतिनिधी)- कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूरग्रस्तांना शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडून दहा ऐवजी आता बारा कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. संस्थानने मंजूर केलेल्या दहा कोटींच्या निधीला मंजुरी देताना उच्च न्यायालयाने स्वच्छता साहित्य खरेदीसाठी आणखी दोन कोटी रुपये त्या दोन्ही जिल्ह्यांना थेट द्यावेत, असा आदेश दिला. 

याचिकाकर्ते संजय काळे व संदीप कुलकर्णी यांचे वकील अ‍ॅड. सतिष तळेकर, अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर, अ‍ॅड. अजिंक्य काळे यांनी न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले की, मदतीचा ओघ मोठा आहे. पण झालेल्या नुकसानीमुळे व पुरात मृत जनावरांच्या दुर्गंधीमुळे दोन्ही जिल्ह्यात आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.

त्यासाठी साईबाबा संस्थानने या दहा कोटी बरोबरच जिल्हाधिकारी कोल्हापूर व सांगली यांना स्वतंत्र निधी केवळ सॅनिटरी साहित्य खरेदी करण्यासाठी परस्पर द्यावेत. तसेच दोन्हीही जिल्हाधिका़र्‍यांनी जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागामार्फत फवारणी करून आरोग्य अबाधित ठेवावे. उच्च न्यायालयाने दोन्ही जिल्हाधिकारी यांना प्रत्येकी एक कोटी रूपये मंजूर केलेत व 17 तारखेपर्यंत संस्थानने पैसे जिल्हाधिकारी खात्यावर वर्ग करण्याचे आदेश दिलेत.

दोन्ही जिल्हाधिकारी यांनी दहा आठवड्यात उच्च न्यायालयात केलेल्या खर्चाचा तपशील सादर करण्याचे पुढील निर्देश दिले असल्याची माहिती याचिकाकर्ते संजय काळे व संदिप कुलकर्णी यांनी दिली.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!