Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

34 लाख 68 हजार मतदार

Share

  तीन हजार 722 केंद्रांवर मतदानाची व्यवस्था

अहमदनगर (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ असून त्यात एकूण 34 लाख 68 हजार 522 मतदार आहेत. यात सर्वाधिक तीन लाख 40 हजार 390 मतदार शेवगाव तालुक्यात आहेत, तर सर्वात कमी मतदार अकोले तालुक्यात (दोन लाख 53 हजार 969) आहेत.

निवडणूक शाखेकडून दोन महिन्यांपासून अद्ययावत मतदारयादी तयार करण्याचे काम सुरू होते. अखेर 31 ऑगस्ट रोजी विधानसभेसाठी आवश्यक अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली. यात लोकसभा निवडणुकीपासून आतापर्यंत सुमारे 30 हजार मतदार वाढले आहेत. तर दुबार, मृत अशी पाच हजार नावे यादीतून वगळण्यात आली.

जिल्ह्यातील 12 मतदारसंघांत 34 लाख 68 हजार 522 मतदार आहेत. त्यात 18 लाख पाच हजार 526 पुरुष, तर 16 लाख 71 हजार 459 स्त्री मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील 12 मतदारसंघात एकूण 162 तृतीयपंथीय मतदारही आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी हीच मतदारांची संख्या 34 लाख 38 हजार 551 एवढी होती. म्हणजे गेल्या चार महिन्यांत मतदारांची संख्या 29 हजार 971 एवढी वाढली आहे. हीच यादी विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहे. दरम्यान, मतदारनोंदणी अभियान निवडणुकीपर्यंत निरंतर सुरू राहील. नंतर मतदारांची ही पुरवणी यादी मुख्य यादीला जोडली जाईल.

विधानसभानिहाय मतदार

अकोले 2 लाख 53 हजार 969, संगमनेर 2 लाख 69 हजार 283, शिर्डी 2 लाख 62 हजार 164, कोपरगाव 2 लाख 64 हजार 388, श्रीरामपूर 2 लाख 86 हजार 552, नेवासा 2 लाख 62 हजार 137, शेवगाव 3 लाख 40 हजार 390, राहुरी 2 लाख 91 हजार 250, पारनेर 3 लाख 20 हजार 101, नगरशहर 2 लाख 89 हजार 106, श्रीगोंदा 3 लाख 10 हजार 229, कर्जत-जामखेड 3 लाख 18 हजार 953 एकूण 34 लाख 68 हजार 522 असे आहेत.

सर्वाधिक मतदार शेवगाव-पाथर्डीत

जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ असून यात सर्वाधिक मतदार हे शेवगाव-पाथर्डीमध्ये 3 लाख 40 हजार 390 असून त्यानंतर 3 लाख 20 हजार पारनेर, 3 लाख 10 हजार श्रीगांेंदा मतदारसंघात आहेत. सर्वात कमी मतदान अकोले तालुक्यात 2 लाख 53 हजार आहेत.

15 जुलैला जिल्हा निवडणूक शाखेने प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली होती. त्यानंतर यादीवर हरकती घेणे, दुबार नावे, मयत स्थलांतरी नावे वगळण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. लोकसभा निवडणुकीनंतर साधारणपणे 35 हजार नव्याने मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ठ करण्यात आली होती. यातील सुमारे 5 हजार नावे हे मयत, स्थलांतरीत आणि दुबार मतदारांची असल्याने ती वगळण्यात आली आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात 7 हजार बीयु, 5 हजार 230 सीयु आणि 5 हजार 450 व्हीव्हीपॅट प्राप्त झालेले आहेत. त्याची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण झाली असून सर्व मतदारसंघासाठी वापरण्यात येणार्‍या ईव्हिएम मशीन्ससोबत व्हीव्हीपट जोडण्यात येणार आहेत. यामुळे मतदारांना स्वत: केलेल्या मतदारांची खात्री पटणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!