अकरावी अर्जाचा दुसरा भाग 16 जूनला पासून भरावा लागणार; 24 हजार अर्जांची विक्री, 22 हजार अर्जांची पडताळणी पूर्ण

0

 

नाशिक : अकरावी ऑनालाईन प्रवेशासाठी आतापर्यंत 24 हजार अर्जांची विक्री झाली असून 23 हजार अर्ज विद्यार्थ्यांनी भरून दिले आहेत. त्यापैकी 22 हजार अर्जांची पडताळणी पूर्ण झाल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली.

अकरावी प्रवेशासाठी यंदा प्रथमच ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना अर्जवाटप करण्यात आलेले असून या अर्जातील पहिला भाग विद्यार्थ्यांनी भरला आहे.

दहावीचा निकाल आज दि.13 रोजी जाहीर होणार असल्याने या अर्जाचा दुसरा भाग दिनांक 16 जून ला भरून द्यावयाचा आहे. दुसरा भाग भरल्यानंतर अर्जाची प्रवेशप्रक्रिया पूर्ण होणार आहे.

रिपिटर विद्यार्थ्यांसाठी भाग दोनमध्ये शाळेचा संकेत क्रमांक या रकान्यात कोणताही प्रकारचा बिंदू अथवा खूण करावयाची नाही अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

दरम्यान शहरातील 55 हून अधिक महाविद्यालयात ही प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून ऑनलाईन प्रवेशाबाबत योग्य प्रकारे जनजागृती करण्यात आली होती शिवाय मुख्याध्यापकांच्या बैठकीतून या प्रवेशाबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.

LEAVE A REPLY

*