अकरावी प्रवेशाची प्रकिया ऑफलाईनच !

0
जळगाव । दि.16 । प्रतिनिधी-दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशप्रकियेची लगबग सुरु असून प्रवेशप्रक्रियेबाबत आज सहाय्यक शिक्षण संचालक दिलीप गोविंद यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. यावेळी शिक्षण संचालक यांनी अकरावी प्रवेशाची प्रकिया ऑफलाईनच होणार असल्याचे सांगितले
अकरावी प्रवेशाबाबत आज प्राचार्यांची मू.जे. महाविद्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी सहाय्यक शिक्षण उपनिरिक्षक ए.बी.बागुल, जि.प.उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक आर.एल.माळी, उपप्राचार्य पी.डी.भोळे, ज्येष्ठ मार्गदर्शक सुनिल गरुड उपस्थित होते.

बेठकीवेळी कुठल्याही महाविद्यालयात कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखेमध्ये 11 वीसाठी क्षमतेपेक्षा किंवा मंजूर जागांपेक्षा अधिकचे प्रवेश द्यायचे असल्यास त्यासाठी जि.प.च्या शिक्षण विभागाची परवानगी बंधनकारक राहील. ही परवानगी घेतली नाही तर संबंधित प्रवेशांवरील अनुदान मिळणार नाही,

एकही विद्यार्थी वंचित राहता कामा नये
जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतील याची व्यवस्था करण्यात यावी तसेच वाढीव प्रवेशासंदर्भात मंजूरी घेऊन जिल्ह्यातील एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे.

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शन केंद्र उघडावी, यामध्ये कोणत्या महाविद्यालयात जागा रिक्त आहे याची माहिती उपलब्ध होईल़ आणि त्याठिकाणाहून विद्यार्थ्यांना आपल्याल कोठे प्रवेश मिळू शकतो याची माहिती मिळेल़ त्याकरीता शाखानिहाय प्रवेश क्षमता व प्रत्येक फेरी नंतरच्या रिक्त जागांचा तपशील वेळोवेळी प्रसिद्ध करावे.

तसेच प्रवेश क्षमतेपेक्षा जादा प्रवेश होतील तेथे प्राचार्यांनी किती विद्यार्थी जादा होतील याची यादी शिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनास आणून प्रवेशाची कार्यवाही करावी, विज्ञान शाखेसाठी 35 टक्के गुण आवश्यक आहे, जातीच्या प्रमाणपत्रासाठी प्रवेश अर्ज नाकारु नयेत, अशा अनेक सुचना उपस्थित मुख्याध्यापक, प्राचार्य व शिक्षक यावेळी देण्यात आल्या.

 

LEAVE A REPLY

*