नाशिक शहरात करोनाची रुग्णसंख्या ११५ वर; ४२ रुग्ण करोनामुक्त

jalgaon-digital
3 Min Read

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात करोना रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत असुन सोमवारी (दि.25) रोजी दुपारपर्यत असलेल्या 99 रुग्णांचा आकडा रात्री आठ वाजता वाढुन तो 115 पर्यत गेला आहे.

केवळ सोमवारच्या एका दिवसात 31 रुग्णांची भर पडल्याने नाशिक महापालिका प्रशासनांची धावपळ सुरू झाली आहे. शहरातील बाधी रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अति जोखमीच्या व्यक्तींना करोना होत असल्याचे समोर आले आहे.

यामुळे शहरातील संजीवनगर, वडाळागांव, रामनगर पेठरोड हे हॉटस्पॉट बनल्याचे समोर आल्याने आता वाढता संसर्ग रोकण्याचे महापालिका प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

शहरात प्रभात वसाहत संजीवनगर शिवार (सातपूर अबंड लिंकरोड) येथील मृताच्या संपर्कातील 16 जणांचे अहवाल दि. 22, 23 व 24 मे रोजी पॉझिटीव्ह आले आहे. तसेच विसे मळा कॉलेजरोड येथे राहणारे मालेगांव येथील पोलीस सेवक यांच्या कुटुंबातील 4 जणांचे नमुने पॉझिटीव्ह आले आहे. तसेच वडाळागांव येथील चालकांच्या संपर्कातील बाधीताचा आकडा वाढत चालला आहे.

तसेच शिवाजीवाडी भारतनगर येथील किराणा दुकानदाराच्या संपर्कातील आकडा देखील वाढत चालला आहे. अशाप्रकारे बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती बाधीत होत असल्याने सोमवारी बाधीतांचा आकडा वाढत जाऊन 99 पर्यत पोहचला असतांना याच दिवशी रात्री 8 वाजता हा आकडा 115 पर्यत जाऊन पोहचला आहे. यावरुन शहरातील बाधीतांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने महापालिका प्रशासन कामाला लागले आहे.

सोमवारी रात्री आठ वाजता शहरातील 16 रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. यात मुमताझनगर वडाळा येथील रुग्णांच्या संपर्कातील 65 वर्षीय महिला, शिवाजीवाडी भारतनगर येथील रुग्णांच्या संपर्कातील 56 व 75 वर्षीय महिला, पंचवटीतील रामनगर येथील मृत व्यक्तींच्या संपर्कात आलेले 8 पुरूष ( वय 32, 20, 21, 19, 18, 7 व 5 वर्ष) व 5 महिला (वय 65, 40, 34, 13 व 12 वर्ष) अशा 13 जण अशा एकुण 16 जणांना करोना झाल्याचे आलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. अशाप्रकारे शहरातील एकुण रुग्णांचा आकडा 115 झाला असला तरी यापैकी 42 बाधीत बरे झाल्यानंतर घरी गेले आहे.

दरम्यान, शहरात आजपर्यत करोना बाधीत भागातून आलेल्याची संख्या 2097 झाली असुन यातील 815 जणांचा देखरेखीखालील 14 दिवसाचा कालावधी पुर्ण झाला आहे. आत्तापर्यत शहरातील रुग्णालयात 2280 संशयितांना दाखल करण्यात आल्यानंतर उपचार झाल्यानंतर 2135 जणांना घरी सोडण्यात आले.

दरम्यान 6 एप्रिल ते 25 मे 2020 या कालावधीत शहरात 115 रुग्ण आढळून आले असुन ते राहत असलेल्या घराजवळील परिसर असे एकुण 50 भाग आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन जाहीर केले होते. यातील 27 प्रतिबंधीत क्षेत्रात नव्याने करोना रुग्ण आढळून न आल्याने याठिकाणचे निर्बंध पुर्णपणे हटविण्यात आले आहे.

नाशिक मनपा क्षेत्रस्थिती (26 मेपर्यत)

  • एकुण पॉझिटीव्ह – 115
  • पुर्ण बरे झालेले – 42
  • मृत्यु – मनपा 6
  • उपचार घेत असलेले – 191
  • प्रलंबीत अहवाल – 157
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *