संगमनेरात 1100 किलो गोमांस पकडले

0

32 जिवंत वासरांची सुटका

संगमनेर (तालुका प्रतिनिधी) – शहर पोलिसांनी शहरातील मदिनानगर याठिकाणी छापा टाकत 800 किलो गोमांससह 32 जिवंत वासरे तर जमजम कॉलनी येथे छापा टाकत 300 किलो गोमांस पकडल्याची घटना मंगळवार दि. 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी व बुधवार दि. 29 नोव्हेंबर रोजी 5.30 वाजेच्या सुमारास घडली. दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये एकूण 1 लाख 10 हजार तर 32 वासरे 1 लाख 60 हजार रुपयांची वासरे असा एकूण 2 लाख 70 हजार रुपयांचे 1100 किलो गोमांस जप्त केले आहे.

अनमत लतिफ कुरेशी व महेबूब मोहम्मद हनिफ कुरेशी (दोघे रा.मदिनानगर) व इतर दोन (नाव माहित नाही) या चौघांनी शहरातील मदिनानगर याठिकाणी 32 वासरे दावणीला बांधून ठेवली होती. तसेच 800 किलो गोमांसही असल्याची माहिती गुप्त खबजयामार्फत शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोकूळ औताडे यांना समजली. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला.

यावेळी 32 वासरांसह 800 किलो गोमांस मिळून आले. 80 हजार रुपयांचे गोमांस, तर 1 लाख 60 हजार रुपयांची वासरे एकूण 2 लाख 40 हजार रुपयांचा हा ऐवज आहे. तर दुसरी कारवाई बुधवारी साडे पाच वाजेच्या सुमारास जमजम कॉलनी याठिकाणी करण्यात आली. यामध्ये 30 हजार रुपये किंमतीचे 300 किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे. या दोन्ही कारवाईत एकूण 1100 किलो गोमांस पोलिसांनी जप्त केले आहे.

त्यानंतर पोलिसांनी खासगी वाहनातून ही सर्व वासरे सायखिंडी येथील पांझरपोळमध्ये सोडण्यात आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक बाळासाहेब अहिरे व रमेश लबडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अनमत लतिफ कुरेशी व महेबूब मोहम्मद हनिफ कुरेशी (दोघे रा.मदिनानगर) व इतर दोन (नाव माहित नाही)व कमरअली गुलाम सौदागर व गुलाम इसाक सौदागर यांच्याविरुद्ध गोवंश हत्याबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गोकूळ औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आर.एम.सानप व पो.हे.कॉ.अण्णा वाघ हे करत आहेत.

LEAVE A REPLY

*