Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशिक @९०२; शहरात ११ नवे रुग्ण करोना पॉझिटिव्ह; सातपूरमध्ये सर्वाधिक रुग्ण, पाच...

नाशिक @९०२; शहरात ११ नवे रुग्ण करोना पॉझिटिव्ह; सातपूरमध्ये सर्वाधिक रुग्ण, पाच बालकांचा समावेश

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरात आज आठ वाजता आलेल्या अहवालात ११ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शहरात वाढलेल्या रुग्णांमुळे नाशिक शहरातील रुग्णांचा आकडा आता ७० वर पोहोचला आहे. तर मालेगावातही आज एक रुग्ण बाधित आढळून आला आहे. मालेगावातील रुग्णसंख्या ६८५ वर पोहोचली आहे. शहरातील विविध भागात रुग्ण आढळून आल्याने मनपा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

- Advertisement -

आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये ७ ते १३ वर्षे वयोगटातील जवळपास पाच बालकांचा समावेश आहे. शहरातील अंबड लिंकरोड येथे 6 रुग्ण, साठे नगर, वडाळा गाव येथे 1, रामनगर, पेठरोड, पंचवटी येथे 1, इंदिरा गांधी परिसर, सिडको-1, हमीद नगर – 2 याठिकाणी रुग्ण वाढला आहेत. शहरातील अनेक भागात पहिल्यांदाच रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

आज वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे नाशिक जिल्ह्यातील रुग्णसंख्या नऊशेच्या पार गेली असून ९०३ करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत ६५४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

मालेगावात आज एक रुग्णाची भर पडल्यामुळे मालेगावातील रुग्णसंख्या आता ६८५ वर पोहोचली आहे. एकट्या मालेगावात शहरात आतापर्यंत ४५ रुग्ण करोना आजाराने दगावले आहेत. तर नाशिक शहरातील मृतांची संख्या आता चारवर पोहोचली आहे. तर अद्याप नाशिक जिल्ह्यातील ३१६ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

नाशिक जिल्ह्यात एकूण ४४४ रुग्णांचा करोना कक्षात उपचार सुरु आहेत. यामध्ये नाशिक जिल्हा रुग्णालयात ४८, नाशिक मनपा रुग्णालयात ६९, वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात ३७, मालेगाव मनपा रुग्णालयात १२९, नाशिक ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात १३५ तर २६ रुग्णांना गृहविलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या