सट्टा प्रकरणी 11 अटकेत

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – पुणे-नगर महामार्गालगत मुन कॅफे या हॉटेलमध्ये आयपीएलमध्ये होणार्‍या मुंबई इंडीयन्स व कोलकत्ता नाईट रायडर्स या फायनल क्रिकेट मॅचवर लाखो रुपांचा सट्टा लावण्यात आला. यात 11 जणांना पोलिसांनी अटक केली असून मुख्य आरोपी (बुकी) पसार झाला आहे. आरोपींकडून एक लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय किशोर घोडके, शेख शब्बीर शरिफोद्दीन, जिशान आयुब खान,   अझरूद्दीन तय्यब झारेकरी, अक्षय सुर्यकांत सोनटक्के, अंकीत प्रेमनाथ घोरपडे, सिद्धार्थ भाऊसाहेब जाधव, सागर मोहन जाधव, उबेद रशीद दातरंगे, वैभव मच्छिंद्र शिरवाळे, इश्‍वर अशोक पाचारणे अशा 11 जणांना अटक करण्यात आली आहे.
तर अनूप देठे पाटील (बुकी) हा पसार झाला आहे. आरोपी हे शुक्रवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास केडगाव जवळील मुन कॅफे या हॉटेलमध्ये आयपीएल मधील मुंबई इंडीयन्स व कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यात होणार्‍या फायनल क्रिकेट मॅचवर सट्टा लावत असल्याची माहीती पोलीस निरीक्षक सोमनाथ मालकर यांना मिळाली होती. त्यांनी कोतवालीचे पथक तयार करुन घटनास्थळी छापा टाकला. त्यात 11 आरोपींसह मोबाईल, सेटअप बॅक्स, केबल, डिश, वही असा एक लाखाचा मुद्देमाल मिळून आला आहे. याप्रकरणी साक्षीदार व पंच यांच्या समक्ष कारवाई करुन कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन करेवाड करीत आहेत.

अशा कृत्यांना पाठीशी घालणार नाही
कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांवर छाप्यांचे सत्र सुरू आहे. आयपीएल सट्टा, अवैध दारु, जुगार जर कोठे सुरू असेल तर नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा. शहरात कोतवालीच्या हाद्दीत अशा प्रकारच्या कृत्यांना अजीबात पाठीशी घातले जाणार नाही. – सोमनाथ मालकर (पोलीस निरीक्षक)

LEAVE A REPLY

*