Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

दहावीचा पेपर रद्द; पुढील तारीख ३१ मार्चनंतर जाहीर होणार

Share
दहावीचा पेपर रद्द; पुढील तारीख ३१ मार्चनंतर जाहीर होणार, 10th paper postponed due to corona virus outbreak

राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली बघायला मिळते आहे. यापार्श्वभूमीवर दहावीचा येत्या सोमवारी (दि.२३) रोजी होणारा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. ३१ मार्चनंतर या पेपरची दिनांक कळविण्यात येईल असेही त्यांनी नमूद केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारी घेतली जात आहे. गर्दी टाळण्याचे आवाहनदेखील केले जात आहे. यासोबतच खबरादारी म्हणून शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी मात्र, दहावीचे पेपर नियमित होतील असे सांगण्यात आले आहोते. मात्र आता दहावीच्या एका विषयाचा अखेरचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे.

सोमवारी 23 मार्च रोजी भूगोल आणि सामाजिक शास्त्र -2 चा पेपर होता. मात्र, राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव वाढला असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी होणारा पेपर आता 31 मार्च नंतर घेतला जाणार आहे. 31 मार्चनंतर परीक्षा पेपरची तारीख जाहीर केली जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!