Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सुरगाणा : १०८ रुग्णवाहिका नादुरुस्त; गरोदर मातेने गाठले टॅक्सीने हॉस्पिटल

Share

मनखेड | वार्ताहर

सूरगाणा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या मनखेड येथे गेल्या महिन्याभरापासून १०८ रुग्णवाहिका नादुरुस्त आहे. यामुळे परिसरातील गरोदर मातांना खासगी वाहनांनी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पंचक्रोशीतील रुग्णांची याठिकाणी मोठी गर्दी असते, त्यामुळे रुग्णवाहिका लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी केली जात आहे.

मनखेड प्राथमिक आरोग्य केंद्रातील एकूण गावांची संख्या बघता मनखेड, जायविहीर, भाटविहीर, आंब्याचापाडा, रानपाडा, वडपाडा, वांजुळपाडा, भाटविहीर, नडगदरी, सादुडणे, हेमाडपाडा, मुरुमदरी, ओरंबे, दुमी, मांगदे, कवेली, पंगाबारी, गळवड, शिरीषपाडा या गावातील रुग्ण नियमित येत असतात.

गंभीर आजारी असलेले किंवा गरोदर मतांची संख्या यात मोठी असते. रुग्णवाहिका तालुक्याच्या ठिकाणी रुग्ण घेऊन जाण्यासाठी असली तर ठीक नाहीतर खासगी वाहनाने रुग्ण तालुका किंवा जिल्ह्याचे ठिकाण गाठतात.

गरोदर मातांना खासगी वाहनातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो आहे. गावांची संख्या बघता याठिकाणी दोन रुग्णवाहिका असणे गरजेचे आहे. मात्र, याठिकाणी एक रुग्णवाहिका असून तीदेखील नादुरुस्त अवस्थेत असल्यामुळे प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

परिसरातील जायविहीर येथील एका गरोदर मातेला मध्यरात्री प्रसूतीकळा येऊ लागल्याने तिला मनखेड आरोग्य केंद्रात दाखल करावयाचे होते. मात्र, १०८ रुग्णवाहिका नादुरुस्त असल्यामुळे या महिलेला खड्ड्यांचा रस्ता तुडवीत खासगी वाहनाने मनखेड गाठावे लागले. याठिकाणची परिस्थिती सावरण्यासाठी लवकरात लवकर रुग्णवाहिका आरोग्य केंद्राला मिळाली अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


प्राथमिक आरोग्य केंद्र मनखेड येथील रुग्ण सेवा वाहन हे गेल्या एक महिन्यापासून नादूरूस्त असल्याने या भागातील गरोदर माता तसेच इतर रुग्णांची हेळसांड होत आहे.

डॉ. आडे, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र मनखेड


मनखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण एकोणीस ते वीस गावे येत असून आम्हाला १०८ रुग्ण सेवा वाहन नसल्याने मोठ्या अडचणीला सामना करावा लागत असून १०८ रुग्ण सेवा तात्काळ उपलब्ध करून द्यावी.

रंजना गायकवाड, सदस्य ग्रामपंचायत मनखेड


आम्हाला १०८ रुग्ण सेवा वाहन नसल्याने ती नादूरूस्त जरी असली तरी जो पर्यंत ती गाडी दुरुस्त होत नाही तोपर्यंत तात्पुरती व्यवस्था म्हणून दुसऱ्या वाहनाची व्यवस्था करावी.

निर्मला कामडी, सरपंच ग्रामपंचायत मनखेड

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!