भंडारा येथे अन्नातून 115 विद्यार्थ्यांना विषबाधा

0

भंडारा : आदिवासी विभागीय क्रीडा स्‍पर्धेच्या उद्धाटनानंतर झालेल्या जेवणातून ११५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे सर्व विद्यार्थी पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत.या विद्यार्थ्यांवर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असून वृत लिहिपर्यंत रुग्णालयात दाखल करणाºया विद्यार्थ्यांची संख्या वाढतच होती.

शनिवारी सकाळच्या सत्रात आदिवासी विकास विभागीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनानंतर विज्ञान प्रदर्शनीची पाहणी करण्यात आली .यानंतर सर्वच खेळाडू व शिक्षकांना जेवण देण्यात आले. यात बहुतांश जणांना काही तासानंतर मळमळ वाटणे, डोकेदुखी व उलट्या होण्याचा त्रास झाला. दुपारी साडेतीन ते चार वाजतापर्यंत जेवण आटोपले. मात्र तोपर्यंत काही विद्यार्थ्यांना त्रास उद्भवल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
विशेष म्हणजे विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही विषबाधा झाली आहे. विषबाधा झाल्यानंतर रुग्णालयातील डॉक्‍टरांनी अन्‍न, पाणी याची तपासणी केली. अशुद्ध पाण्याचा वापर झाल्याने ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्‍यक्‍त करण्यता येत आहे. जेवण करताना पिण्याचे पाणी संपल्यामुळे जलकुंभातील पाणी देण्यात आले. विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी दोन हजार ७०० मुलांसह ३०० शिक्षकांनी सहभाग नोंदविला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी खेळाडू सहभागी होऊनही योग्य पद्धतीने नियोजन झाले नसल्याची प्रतिक्रीया विद्यार्थी, शिक्षक व्‍यक्‍त करीत आहेत.

रात्री उशिरापर्यंत अस्वस्थ वाटणाºया विद्यार्थ्यांना रुग्णालयात आणण्याचे कार्य सुरुच होते. यात १४ विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले असून उर्वरीत विद्यार्थी व शिक्षकांना प्रथमोपचार करून जिल्हा क्रीडा संकुलात विश्रांतीसाठी पाठविण्यात आले. रुग्णालयात एकात्मिक प्रकल्प अधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी भेट देत विद्यार्थ्यांची विचारपूस केली. यात त्यांनी खाल्लेले अन्न व पाणी यात दोष होता काय? याबाबत चौकशी केली.

LEAVE A REPLY

*