Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

शिवजयंती निमित्त 100 व्याख्याने; जिल्हा इतिहास संशोधन संस्थेचा उपक्रम

Share

नाशिक । प्रतिनिधी

शिवजयंतीचेनिमित्त साधत लढायांंव्यतिरिक्त शिवाजी महाराजांंच्या व्यक्तिमत्वाचे, त्यांच्या धोरणांचे विविध सत्य पैलू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवून समतेचा संदेश देण्यासाठी जिल्हा इतिहास संशोधन संस्थेच्या वतीने शाळा, महाविद्यालयांमध्ये 100 व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार आहे.

केटीएचएम महाविद्यालयाच्या इतिहास विभागातील सभागृहात याबाबत आज दुपारी व्याख्यात्यांची कार्यशाळा झाली. यामध्ये जिल्ह्याभरातील व्याख्यात्यांनी सहभाग घेतला होता. यात इतिहास संशोधक, प्राध्यापक, शिक्षक, वकील, पत्रकार, इतिहास अभ्यासक यांनी सहभाग नोंदवला.

यावेळी इतिहास संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. यशवंत साळुंखे यांनी सांगितले की, सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांनी केलेल्या लढाया, चतुराई या अनुषंगानेच परिचित आहेत. परंतु शिवाजी महाराजांचे समाज सुधारणावादी धोरण, स्त्री सुधारणा, शेतीधोरण, अर्थ नियोजन, जलनीती, चिरकालीन नियोजन यासह अनेक विविध पैलू माहीत नाहीत.

त्यांनी स्वराज्यात समता नांदावी, यासाठी अनेक कडक उपाययोजनाही केल्या आहेत. याची माहिती सर्वांपर्यंत पोहचावी, महाराजांंच्या सर्वांगीण इतिहास तळागाळापर्यंत पोहचून समाजात समता नांदावी हा यामागील उद्देश असल्याचे स्पष्ट केले. या उपक्रमास सर्वांनी साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले. या कार्यशाळेस संस्थेचे उपाध्यक्ष मोहन पवार, सचिव डॉ. रामदास भोंग यांच्यासह व्याख्याते, इतिहास अभ्यासक उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!