Type to search

Featured नाशिक

इटर्निटी प्री-स्कूलच्या विद्यार्थ्यानी बनवली 10 फुट उंच पतंग; नायलॉन मांजाचा वापर टाळण्याचा जागर

Share
नाशिक | प्रतिनिधी
इटर्निटी प्री-स्कूल शाळेत पतंगप्रेमी विद्यार्थ्यांनी 10 फुट उंच पतंग बनवली आहे. या विषयातील माहिती असल्याने शाळेचे संस्थापक जॅक्सन नाडे यांनी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पतंग बनवण्यासाठीचा कागद, मोजमाप, तो कसा बनवायचा, चांगला पतंग बनवण्यासाठी काय काळजी घ्यायची या गोष्टी प्रात्यक्षिकांसह उलगडल्या. मध्यम आकारातला पतंग आणि एक मोठा पतंग त्यांनी बनवून दाखविला.
त्यासह शाळेतील सर्व सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांकडून त्यांनी सुंदर पतंग बनवून घेतल्या. इटर्निटी प्री-स्कूल मधिल सहभागी झालेल्या पतंगप्रेमी विद्यार्थ्याना प्रथमच पतंगाची शास्त्रशुद्ध माहिती मिळली. पतंग उडवणं जेवढं अवघड तेवढाच तो तयार करणंही अवघड आहे. विद्यार्थी पहिल्यांदाच पतंग बनवणं शिकले तसेच आपल्या पतंग व मांजा मूळे कोणाला काही हानी होणार नाही याची दक्षता कशी घ्यावी यावर त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
नायलॉन मांजाचा वापर टाळावा असा संदेश देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या. सर्व मुलांना पतंग वाटप करण्यात आल्या. या उपक्रमात मुलांसह मोठ्यांनीही पतंग बनवण्याचा आनंद लुटला. यावेळी शाळेचे सहकारी नेल्सन सर, शिक्षिका प्रीती कांबळे व सुनिता इफ्राइम यानी देखील सहभाग घेउन कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला.
Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!