10 जुलैला मल्ल्यांना हजर करण्याची सुनिश्चित करा; गृह मंत्रालयाला सर्वाेच्च न्यायालयाचे आदेश

0
सर्वाेच्च न्यायालयाने विजय मल्ल्या यांना १० जुलै रोजी न्यायालयात हजर करण्याची निश्चिती करावी, असे गृह मंत्रालयाला आदेश दिले आहेत.
मल्ल्या मार्च २०१६ पासून ब्रिटनमध्ये राहत आहेत. एका दिवसापूर्वी कोर्टाने मल्ल्यांना अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते.
मल्ल्यांनी आपल्या मालमत्तेचे संपूर्ण विवरण सादर केले नव्हते. मल्ल्यांनी सुमारे ४ कोटी डॉलर्स मुलांच्या नावावर हस्तांतरित करून कर्नाटक हायकोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केले. या प्रकरणात शिक्षेवर सुनावणीसाठी कोर्टाने मल्ल्यांना १० जुलैला उपस्थित राहण्याचे अादेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

*