10 कोटी रुपये खर्चाच्या काकडी ते रांजणगाव देशमुख रस्त्याचे भूमिपूजन

0

कोपरगाव (प्रतिनिधी)- राज्यातील युती शासनाने चालू अर्थसंकल्पात तालुक्यातील काकडी ते रांजणगाव देशमुख या प्रजिमा 84 रस्त्याचे 10 कोटी रुपये खर्च करून मजबुतीकरण व डांबरीकरणांच्या कामाचे भूमिपूजन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले.

 
काकडी विमानतळ अंतर्गत विकासात्मक कामाच्या माध्यमातून या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याप्रसंगी संजीवनी कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजीराव वक्ते, साईनाथ रोहमारे, अशोकराव औताडे, बापूसाहेब औताडे, बाजार समितीचे उपाध्यक्ष नानासाहेब गव्हाणे, रामदास रहाणे, निवृत्ती गोर्डे, बाळासाहेब वक्ते, अप्पासाहेब औताडे, प्रल्हाद गाडे, रामनाथ गव्हाणे, विलास डांगे, भीमराज गुंजाळ, वाल्मीकराव कांडेकर, विलास सोनवणे, श्री. भालेराव, प्रवीण सोनवणे, नवनाथ कांडेकर, दिगंबर कांडेकर, कैलास रहाणे, विक्रम पाचोरे आदी उपस्थित होते.

 

आ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, शिर्डी साई समाधी शताब्दी सोहळा 2018 मध्ये साजरा होत आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने नियोजित काकडी विमानतळ सुरू व्हावे म्हणून येथील सर्व कामे तातडींने मार्गी लावण्यांचे काम सुरू केले आहे. विमानतळ विकास प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक व त्यांच्या सहकार्‍यांनी काकडी विमानतळ परिसरातील रस्त्यांचे कामे प्राधान्याने हाती घेऊन ती मार्गी लावण्यावर भर दिला आहे. तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या जलगदतीने कशा सोडविल्या जातील यावरही भर दिला आहे.

 

त्यासाठी मंत्रालयीन स्तरावर बैठकाही घेतल्या आहेत. तसेच काकडी विमानतळ नोकर भरतीत प्रकल्पग्रस्तांबरोबरच सुशिक्षित बेरोजगारांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित कार्यान्वयीन यंत्रणेशी आपले बोलणे झाले असून त्याबाबत बैठकही घेतली आहे, असेही त्या म्हणाल्या.

 

LEAVE A REPLY

*