Type to search

मुख्य बातम्या सार्वमत

नगर-मनमाड रस्त्यावर ट्रक दुचाकी अपघातात महिला ठार, एक जण जखमी

Share
नांदगाव : पोटच्या मुलीचा बापासमोर मृत्यू तर पत्नीने दवाखान्यात सोडला जीव Nandgoan Wife and Daughter Dead in Eicher-Motorcycle Accident

शिर्डी – कोपरगाव तालुक्यातील नगर-मनमाड रस्त्यावर जनार्दन स्वामी मंदिरासमोर मालट्रक आणि दुचाकीच्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी आहे. ऐन दिवाळीच्या सणात दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार अपघातात संगिता मच्छिंद्र रहाणे (अंदाजे वय 40, रा. बहादरपुर, ता.कोपरगाव) या महिलेचा मालट्रकखाली सापडून जागीच मृत्यू झाला तर मच्छिंद्र रहाणे हे गंभीर जखमी झाले असुन त्यांच्यावर कोपरगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नगर कडून मनमाडच्या दिशेने जाणाऱ्या मालट्रक क्र MH 16 CC 6433 आणि दुचाकीचा अपघात होऊन सोमवारी ही घटना घडली.

घटना घडताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. अपघात होताच ट्रक चालक घटनास्थळावरुन फरार झाल्याचे समोर येत आहे. मात्र ट्रक मधील एकाला जमावाने चोप दिल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!