गुटीरोद्योगाच्या ‘गोदाई’ प्रदर्शनाला नागरीकांचा प्रतिसाद

नाशिक । प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवनोन्नती अभियांनांतर्गत विभागिय महसूल आयुक्त कार्यालय व जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा यांच्या वतीने 16 ते 22 फेब्रुवारी दरम्यान आयोजित ‘गोदाई’ या विभागिय प्रदर्शन व विक्री महोत्सवाला नागरीकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामिण रोजगाराला चालना देण्याचा उद्देश आहे. या माध्यमातून संघटन, बचत, उत्पादन, विपणन, व उद्धार या पाच सूत्रांच्या माध्यमातून व्यवसायी उभारलेल्या सुक्ष्म कुटीर उद्योगांना व्यासपिठ देण्याचा प्रयत्न या प्रदर्शनाद्वारे करण्यात आला आहे.

या प्रदर्शनात एकूण 200 स्टॉल्स उभारण्यात आलेले आहेत. त्यात 50 स्टॉल्सच्या तीन डोमच्या माध्यमातून विविध उत्पादनांचे 150 स्टॉल्स मांडण्यात आलेले आहे. तर 50 स्टॉल्स हे खाद्य पदार्थांचे स्टॉल्स आहेत. याठिकाणी विभागातून दर्जेदार उत्पादने घेऊन व्यवसोयीकांनी आपापली दुकाने मांडलेली आहेत. काल सकाळच्या सत्रात नागरीकांनी पाठ फिरवली असली तरी सायंकाळी मात्र चांगली गर्दी पहायला मिळाली. विविध घरगुती वाळवण, मसाले, गुळ, खाद्य पदार्थ, बांबूची साहीत्य, नैसर्गिक पध्दतीने सेंद्रिय खतांद्वारे पिकवलेल्या धान्यांना नागरीकांची विशेष मागणी दिसून आली विविध प्रकारचे तांदूळ याठिकाणी पहायला मिळाले.

या सोबतच गावरान फळफळावळे देखिल या बाजारात मांडण्यात आलेले आहे. खाद्यपदार्थांचे 50 स्टाल्स असल्याने मात्र या व्यवसायीकांची मोठी कुचंबणा होत असल्याचे चित्र आहे. आपेक्षेप्रमाणे व्यवसाय होत नसल्याने नागरीक हताश झाल्याचे चित्र होते.ग्रामिण व्यवसायांना नागरीकांनी प्रेरणा देण्यासाठी येत्या चार दिवसांत या प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात ङेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *