Thursday, April 25, 2024
Homeनगरउन्हाळ्याची चाहुल : बाजारात माठांची आवक वाढली

उन्हाळ्याची चाहुल : बाजारात माठांची आवक वाढली

नेवासा बुद्रुक (वार्ताहर)- उन्हाळ्याची चाहूल लागली असून दरवर्षी प्रमाणे यंदाही बाजारात मातीचे माठ, केळी, रांजण विक्रीसाठी येऊ लागले आहेत. आरोग्यदायी थंड पाण्यासाठी बाजारात माठांची मागणी वाढली असून मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.

तालुक्यातील अनेक छोट्या मोठ्या गावांमध्ये माठ-रांजणांचे मिनी कारखाने सुरू आहेत. माठ बनवून अनेक छोटे छोटे कारागीर उदरनिर्वाह करत आहेत.

- Advertisement -

हस्तकला कौशल्य अवगत केलेले कारागीर माठांवर वेगवेगळे नक्षीकाम करून अधिक कमाई करत आहेत. दिवसभर माती कोळसा यात कारागीर मग्न होऊन माठ घडवत आहेत तसेच मठातील पाणी हे आरोग्यासाठी देखील चांगले असल्याचे बोलले जाते.

उन्हाळ्यात उन्हापासून बचावासाठी टोपी, छत्री, उपरणे, स्कार्फ परिधान करून घराबाहेर पड़ताना दिसू लागले आहेत.उन्हाचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना होत आहे. सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. मार्च सुरू होताच तापमानाचा पारा वाढण्यास सुरुवात झाली असून तो आणखी वाढणार आहे. बाजारात गॉगल्स, टोपी, उपरणे, मास्क आशा विविध वस्तूंची दुकाने हायवेच्या कडेला लागलेली दिसत आहेत.

नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत व शिरूर, पुणे, औरंगाबाद, नगर, नवी मुंबई, पनवेल अशा विविध शहरी भागांत नेवासा तालुक्यातील माठ विक्रीसाठी जात आहेत. शहरी भागात या हस्तकलेद्वारे नक्षीकाम केलेल्या माठांना मोठी मागणी आहे. गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी माठांच्या भावात वाढ झाली आहे.
– बाबासाहेब शिर्के, विक्रेता

माठांचे बाजारातील भाव
50 लिटरचा माठ 250 रुपये, 35 लिटरचा माठ 180 रुपये, 20 लिटरचा माठ 130 रुपये, केळी 50 ते 70 रुपये, रांजणी मोठी 500 ते 700 रु., 40 लिटरचे कॉकसह डिझाईन माठ 250 रुपये

- Advertisment -

ताज्या बातम्या