५ आणि ६ ऑक्टोबरला रंगणार ‘आयएनटी’ची अंतिम फेरी

0

कॉलेजविश्वातल्या नाट्यप्रेमींचं मुख्य आकर्षण ठरणाऱ्या आयएनटी एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत दहा एकांकिका दाखल झाल्या आहेत.

तरुणाईचं लक्ष वेधून घेणाऱ्या या स्पर्धेची अंतिम फेरी ५ आणि ६ ऑक्टोबरला चर्चगेट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये रंगणार आहे.

तरुणाईचा सळसळता उत्साह, सर्जनशीलता यांचं प्रतीक असणाऱ्या ‘आयएनटी’ची प्राथमिक फेरी नुकतीच पार पडली. प्राथमिक फेरीतून केवळ दहा एकांकिकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे.

यात जोशी-बेडेकर, रुईया, डहाणूकर, सिध्दार्थ, शंकर नारायण व्हीजेटीआय, कीर्ती, सिडनहॅम, ज्ञानसाधना, शैलेंद्र कॉलेज यांचा समावेश आहे. गतवर्षी आयएनटीचं विजेतेपद पटकावलेल्या जोशी-बेडेकर कॉलेजच्या रंगकर्मींना आपलं विजेतेपद कायम ठेवण्यासाठी यंदा चांगलीच मेहनत करावी लागत आहे. स्पर्धेची अंतिम फेरी अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉइंट इथे होईल.

यंदाच्या आयएनटीचा भाग असलेल्या स्पर्धकांना, दिग्दर्शकांना चर्चासत्रामुळे अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. याचा फायदा त्यांना त्यांच्या भविष्यातल्या कारकीर्दीसाठी नक्कीच होईल. आणि यामुळेच अंतिम फेरी देखील पाहण्यासारखी असेल ह्यात काही शंकाच नाही.

LEAVE A REPLY

*