५८ वर्षाच्या कमलाबाई कस्तुरे ११ किमी पायी फिरुन वाटप करताय टपाल

0

जयेश शिरसाळे | जळगाव :  चुलं आणि मुलं सांभाळून कठीण परिस्थितीवर मात करुन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी यशस्वीपणे पेलून संसाराचा गाढा ओढत असलेल्या शहरातील रुख्मिणी नगरमधील रहिवाशी कमलाबाई कस्तुरे गेल्या २३ वर्षापासून पोस्टमन म्हणून कार्यरत आहे.  वयाच्या ५८ व्या वर्षीही त्या दररोज १० ते ११ किलोमीटर अंतर पायी फिरुन टपाल वाटप करतात. त्यांचा संघर्षमय आणि खडतर प्रवास महिला व तरुणींसाठी निश्‍चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

जळगाव पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत असलेले प्रभाकर कस्तुरे यांचे जुलै १९९३ मध्ये निधन झाल्याने कस्तुरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. प्रभाकर कस्तुरे यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी अनुकंप तत्वावर त्यांच्या पत्नी कमलाबाई कस्तुरे यांना पोस्टमन नोकरी मिळाली.

यावेळी त्यांना हितेश नावाचा दोन वर्षांचा मुलगा होता. अशा परिस्थितीत पोस्टमन म्हणून कार्य करीत असतांना कमलाबाईंना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अक्षरश मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्याला पाळणाघरामध्ये ठेवावे लागले. मुलांचे शिक्षण व स्वःताच्या आजारपणावेळी त्यांना अनेक अडचणी आल्या.

या परिस्थितीत कर्ज देखील काढले. परंतु सुरवातीपासून देवावर विश्‍वास असल्याने संकटकालीन विविध माणसांच्या रुपाने देव धावून आल्याने संकटावर मात करणे शक्य झाले. यावेळी मुलगा हितेश याने परिस्थितीची जाणीव ठेवून या खडतर प्रवासात मला साथ दिली.

डयुटीची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंतआहे. त्यामुळे सकाळी घरून निघतांना संपूर्ण दिवसाचे नियोजन करावे लागते. सध्या मुलगा हितेश पुढील शिक्षणासाठी पुणे येथे असल्याचे कमलबाई यांनी सांगितले.

कमलाबाई कस्तुरे या मे २०१७ मध्ये सेवानिवृत्त होत आहे. पोस्टमन म्हणून काम करतांना ग्राहकांना सेवा देण्यात कधीही पडलो नसल्याचेही त्या म्हणाल्या. सध्या पोस्टमन म्हणून काम करीत असतांना शहरातील जुने जळगाव परिसरातील रामपेठ, कोळीपेठ या भागाच्या टपाल वाटपाची जबाबदारी असून दररोज १० ते ११ किलोमीटर पायी फिरावे लागते. सुरवातीला कामाबाबत काहीही माहिती नव्हती.

यावेळी पोस्टमन अशोक बारी यांनी सहकार्य केल्याचे  कमलबाई कस्तुरे यांनी आर्वजून सांगितले. सध्याच्या परिस्थिती महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहे. त्यामुळे नोकरी करीत असतांना महिलांना अनेक अडचणींना येतात. महिला, तरुणींनी अशा परिस्थित खचून न जाता परिस्थितीला सामोरे जाणून त्यावर मात करावी असा सल्ला कमलाबाई कस्तुरे यांनी महिला व तरुणींना दिला आहे.

LEAVE A REPLY

*