२५ कोटींच्या कामांना तांत्रीक मंजूरी

0

जळगाव |  प्रतिनिधी :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या दोन वर्षापूर्वी जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते. यावेळी शहराच्या विकासासाठी त्यांनी २५ कोटी रुपये निधीची घोषणा केली होती. दरम्यान या निधीतील कामांना सुरुवात करण्यासाठी आ.राजूमामा भोळे यांनी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार प्रस्तावावर शासनाने तांत्रिक मंजूरी दिली असून मनपाने पाठविलेला प्रस्ताव प्रलंबीत ठेवण्यात आला आहे.

जळगाव शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी २५ कोटींच्या निधीची घोषणा केली होती. त्यानुसार निधी वितरीत करण्यासाठीचा अध्यादेश शासनाच्या नगरविकास विभागामार्फत जारी करण्यात आले आहेत.

जळगाव शहरातील विकास कामे निश्चित करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून या समिती मध्ये जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आ. सुरेश भोळे आणि सदस्य सचिव म्हणून जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांचा समावेश केला आहे.

मंजूर झालेल्या निधीतील कामे महापालिकेकडून न होता, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणार आहेत. दरम्यान मुख्यमंत्री यांनी घोषणा केल्यानतंर महापौरांसह सत्ताधारी खान्देश विकास आघाडीने जळगावातील डीपी रस्त्यांच्या कामांसह इतर कामे टाकून २५ कोटीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता.

मात्र आ. राजूमामा भोळे यांनी बांधकाम विभागाकडून प्रस्ताव पाठविला त्यास शासनाची तांत्रिक मंजूरी मिळाल्याचे वृत्त आहे. आ. भोळे यांच्या प्रस्तावात सत्ताधारी यांच्या प्रस्तावातील ११ कोटी रुपयांची कामे जशीच्या तशी आहे. उर्वरित निधीमध्ये शहरातील ज्या भागात गटारी नाहीत त्या भागातील गटारींची कामे होणार असून या प्रस्तावात एकूण ९९ कामांचा समावेश आहे.

भाजपाचे नगरसेवक तसेच भाजपाचे ्विविध वार्डातील कार्यकर्ते यांनी सुचविलेल्या कामांचा यामध्ये समावेश असल्याचे समजते.

 

LEAVE A REPLY

*