१४ मेपासून तेजबहादूर यादव जंतरमंतरवर उपोषण करणार

0

सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) माजी जवान तेजबहादूर यादव येत्या १४ मेपासून दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर उपोषण करणार आहेत.

काही महिन्यांपूर्वी यादव यांनी सीमेवरील जवानांना निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याची तक्रार थेट समाजमाध्यमांवर मांडली होती.

त्यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर देशभरात प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणावर भारतीय लष्कराने एकूणच सावध भूमिका घेतली होती.

त्यानंतर बीएसएफची प्रतिमा मलीन केल्याच्या आरोपवरून गेल्याच महिन्यात तेजबहादूर यादव यांना बडतर्फ करण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर तेजबहादूर यादव यांनी आता देशव्यापी आंदोलन करायचे ठरवले आहे. जवानांना पुरवण्यात येणाऱ्या अन्नापासून ते सीमेवरील हल्ल्यात जवानांच्या होणाऱ्या मृत्यूनंतर सरकारकडून घेतली जाणारी भूमिका यापैकी प्रत्येक गोष्टीत योग्य ते बदल करणे ही त्यांची प्रमुख मागणी आहे.

काँग्रेस पक्षाकडून मुंबईत शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात तेजबहादूर यादव यांनी ही माहिती दिली.

LEAVE A REPLY

*