हॉस्पिटलच्या कारवाईला ब्रेक

0

कोर्ट ऑर्डरनुसार तयारी सुरू, आयुक्तांनी घेतला आढावा

अहमदनगर (प्रतिनिधी)– नगर शहरातील नियमबाह्य हॉस्टिलच्या इमारतीवर सुरू असलेल्या महापालिकेच्या कारवाईला आज शुक्रवारी ब्रेक मिळाला. खंडपीठाने गुरूवारी केलेल्या आदेशानुसार तयारीसाठी हा ब्रेक घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान सुनावणी झालेल्या 121 हॉस्पिटलपैंकी 52 हॉस्पिटलच्या इमारती नियमबाह्य असल्यावर शिक्कामोर्तब झाले असून दोन दिवसांत 69 इमारतींचा आदेश पारीत केला जाणार आहे.
शहरात 52 हॉस्पिटलच्या इमारती या नियमबाह्य असल्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर महापालिकेने कोर्टाच्या आदेशाने कारवाई सुरू केली. 17 हॉस्पिटलच्या इमारतीवर जेसीबीचा घाव घालण्यात आला. खंडपीठाने गुरूवारी ही मोहीम अशीच पुढे सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आयुक्त घनशाम मंगळे व अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्यात आज कोर्ट आदेशावर प्रदीर्घ चर्चा झाली. कारवाईच्या तयारीसाठी आज कारवाईला महापालिकेने ब्रेक दिला. शनिवार, रविवार सुटी असल्याने कारवाई होणार नाही. सोमवारी कारवाई सुरू होईल असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

69 चा आदेश दोन दिवसांत
शहरात 150 हॉस्पिटलच्या इमारती आहेत. त्यातील दोन हॉस्पिटलच्या इमारती या नियमात असल्याचे सांगण्यात आले. 121 डॉक्टरांना नोटीसा देऊन त्यांची सुनावणी घेण्यात आली. त्यातील 52 हॉस्पिटलच्या इमारती या निमयबाह्य असल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. नगररचना विभागाचा अभिप्राय नसल्याने उर्वरित 69 इमारतीसंदर्भात अंतिम आदेश झालेला नव्हता. आता अभिप्राय आला आहे. दोन दिवसांत त्यांच्यासंदर्भातील आदेश पारीत होतील

LEAVE A REPLY

*