हॉलिवूड अभिनेत्री काइली जेनरचा मादाम तुसाँ संग्रालयात पुतळा; सर्वात कमी वयाच्या व्यक्तिचा पुतळा

0

हॉलीवूड टीव्ही स्टार काइली जेनरच्या २०व्या वाढदिवसानिमित्त मादाम तुसाँ संग्रहालयाने कायलीला तिच्या मेणाचा पुतळा वाढदिवस भेट म्हणून दिला.

यामुळे या संग्रहालयाच्या इतिहासात सर्वात कमी वयाच्या प्रसिद्ध व्यक्तीचा पुतळा बसवण्याचा नवा विक्रम कायलीच्या नावावर नोंदला गेला आहे.

काइलीने कुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत वाढदिवसाच्या दिवशी त्या मेणाच्या प्रतिकृतीचे अनावरण केले.

या अनोख्या भेटीबद्दल जेनरने आनंद व्यक्त केला.

त्या हुबेहूब कलाकृतीबरोबर तिने छायाचित्रे काढून आपल्या चाहत्यांसाठीही लगेच इंटरनेटवर अपलोड केली.

LEAVE A REPLY

*