Type to search

हॉकी : ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय

क्रीडा

हॉकी : ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय

Share
ब्रिस्बेन । भारताच्या पुरुष हॉकी संघावर ऑस्ट्रेलियाने 4-0 असा विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाकडून ब्लॅक गोवर्स आणि जेरमी हेवॉर्ड यांनी प्रत्येकी दोन गोल करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या सामन्यात भारताकडे गोल करण्याच्या काही संधी आल्या होत्या, पण या संधीचे सोने त्यांना करता आले नाही. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या भारताचा यापूर्वी तिन्ही सामन्यांत एकदाही पराभव झाला नव्हता.

सामन्याच्या पाचव्या मिनिटाला भारता पेनेल्टी कॉर्नरची संधी चालून आली होती. पण ऑस्ट्रेलियाच्या बचावपटूंनी भारताचा गोल करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. सामन्याच्या 12व्या मिनिटाला हरमनप्रीत आणि नीलकांत शर्मा यांनी ऑस्ट्रेलिया गोलपोस्टवर चाल केली होती, पण यावेळीही भारतीय संघ अपयशी ठरला.

ऑस्ट्रेलियातर्फे ब्लेक गोव्हर्स (15व्या आणि 60व्या) तसेच जेरेमी हेवर्ड (20व्या आणि 59व्या मिनिटाला) यांनी प्रत्येकी दोन गोल केले. भारताला पाचव्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी होती. मात्र हरमनप्रीतच्या फटक्याचा यजमानांच्या गोलकीपरने सुरेख बचाव केला. 12व्या मिनिटाला हरमनप्रीतने निलकांता शर्मासह व्युहरचना रचली. मात्र ऑस्ट्रेलियाच्या बचावफळीने त्यांचा प्रयत्न फोल ठरवला.

पहिला क्वार्टर संपायला काही सेकंद आधी ऑस्ट्रेलियाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र व्यवस्थित ङ्गक्लियरफ न झाल्याने त्यांना पेनल्टी स्ट्रोक बहाल करण्यात आला. त्यावर गोव्हर्सने कुठलीही चूक केली नाही. दुस-या क्वार्टरमध्ये (20व्या मिनिटाला) लागोपाठ पेनल्टी कॉर्नर मिळवताना आघाडी वाढवली. हेवर्डने तो गोल केला. उर्वरित दोन गोल खेळ संपण्यापूर्वी दोन मिनिटे आधी झाले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवी हॉकी लढत शुक्रवारी (17 मे) होईल.

ऑस्ट्रेलियाच्या गोवर्सने सामन्याच्या 15व्या आणि 60व्या मिनिटाला गोल केले. हेवॉर्डने सामन्याच्या 20व्या आणि 59व्या मिनिटाला गोल करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!