हैदराबाद येथे आजपासून दुसरा कसोटी सामना

0
हैद्राबाद । भारत व वेस्टइंडीजमध्ये दुसरा आणि मालिकेचा अंतिम कसोटी सामना उद्या शुक्रवारपासून सुरू होत आहे. पहिल्या सामन्यात एकतर्फी निदर्शने करून तीन दिवसात जिंकणारा भारतीय संघ मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. यात कोणताही शंका नाही की कसोटीचा नंबर-1 संघ या सामन्यात आपली बादशाहत सुरू ठेऊ इच्छिते.

इंग्लंडमध्ये पराभवानंतर भारतासाठी ही मालिका ऑस्ट्रेलिया दौर्‍यापूर्वी गमावलेला आत्मविश्वास प्राप्त करण्याचे काम करेल. तसेच हा सामना त्या खेळांडुसाठी संधी आहे जे इंग्लंडमध्ये आणि नंतर राजकोटमध्ये खेळलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात चांगले प्रदर्शन करू शकले नाही. तसेच वेस्टइंडीजसाठी हा सामना मालिकेला बरोबरीवर समाप्त करण्याची संधी मिळेल. पहिल्या कसोटी सामन्यात यजमान खेळाच्या कोणत्याही क्षेत्रात यजमानीने पुढे निघू शकली नव्हती.

भारताने पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यापूर्वीही आपल्या अंतिम-12 खेळांडुची यादी जाहीर केली ज्यात कोणताही बदल झाला नाही. याचा अर्थ आहेे की या मालिकेसाठी संघात समाविष्ट केलेला सलामी फलंदाज मयंक अग्रवाल ऑस्ट्रेलिया दौर्‍यापूर्वी आपल्या बॅटचे कौशल्य दाखऊ शकणार नाही. त्याला ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी संघात निवडले जाईल ही नंतरची गोष्ट राहिली. राजकोटमध्ये पृथ्वीसोबत डावाची सुरूवात करणार्‍या लोकेश राहुलवर संघातून बाहेर जाण्याची तलवार लटकत आहे. जर तो या सामन्यात बॅटचा जोर दाखऊ शकत नाही तर ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर तो बाहेरही होऊ शकतो. राहुलसाठी या दृष्टीकोणाने हा सामना करियर वाचवण्याचा प्रश्न आहे.

फक्त राहुलच नाही. कसोटी संघाचा उप-कर्णधार अंजिक्य रहाणेसाठी हा सामना खूप महत्त्वपूर्ण आहे. तसेच पहिल्या सामन्यासाठी हा सामना खूप महत्त्वपूर्ण आहे. तसेच पहिल्या सामन्यात त्याने लयाने पुनरागमनाचे संकेत दिले होते परंतु तो आपला कायम ठेऊ शकतोे यावर संघ व्यवस्थापनाची नजर असेल का? मागील सामन्यात रवींद्र जडेजाने बॅट आणि चेंडू दोन्हीने चांगले प्रदर्शन केले होते.

संघ : -भारत : विराट कोहली (कर्णधार), अंजिक्य रहाणे (उप-कर्णधार), लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, ॠषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, उमेश यादव, शार्दूल ठाकुर. वेस्टइंडीज : जेसन होल्डर (कर्णधार), सुनील अम्बीरस, देवेंद्र बिशू, क्रॅग ब—ॅथवेट, रोस्टन चेस, शॉन डॉवरिच, शेनन गॅबि—एल, जाहमर हेमिल्टन, शिमरोन हेटमायेर, शाई होप, शेमरन लुइस, कीमो पॉल, केरन पावेल, जोमेल वारिकन आणि केमर रोच.

LEAVE A REPLY

*