हेरिटेज वॉकव्दारे उलगडला रहाड संस्कृतीचा इतिहास

0

नाशिक : रंगपंचमीचे खास आकर्षण असणार्‍या नाशिक शहराला या रंगोत्सवाचा ऐतिहासिक वारसा लाभला असून , नाशिककरांनी तो गेली 300 वर्षे रहाडींच्या रूपाने जपला आहे. याच वारश्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी नाशिक हेरिटेज वॉक क्लबच्यावतीने हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते.

शनिचौक येथील राहाडी पासून हा वॉक सुरु झाला. शनीचौक मित्र मंडळ, व रास्ते तालीम संघ यांच्या वतीने या राहाडी रंगोत्सवाचे नियोजन केले जाते. प्रा रामनाथ रावळ यांनी रहाडी स्थापत्य म्हणजे काय ? तसेच रंगपंचमी या सणाचे अध्यात्मिक व वैज्ञानिक महत्व सांगताना, नाशिक शहर व होळी, रंगपंचमी या सणांचा इतिहासाचे संबंधांचे अनेक पैलू उलगडले, तर शनिचौक मंडळाच्या वतीने श्री महंकाळे, चिंतू भोरे, श्री दीक्षित यांनी रहाडीचे खोदकामापासून विधिवत पूजा परंपरेबद्दल माहिती दिली.

यानंतर दिल्ली दरवाजा व तांबट लेन मधील राहाडीना नाशिककरांनी भेट दिली, तांबट लेन मधील राहाड 39 वर्षांनी खुली झाल्यामुळे मनोज लोणारी व त्यांचे सहकारी मित्र परिवार अतिशय उत्साहात त्या राहाडी बद्दल माहिती दिली. या हेरिटेज वॉक मध्ये राहाड स्थापत्य, त्याचे प्रथा परंपरा,पूजा, रंग बनवण्याच्या पद्धतीपासून राहाडीचे गर्दी नियोजन याबद्दल जाणून घेताना काही ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना राहाडीतील ’धप्पा’ मारण्याच्या गमती जमती सांगितल्या. सदर वॉकसाठी नाशिक हॅरिटेजचे प्रा. रामनाथ रावळ , स्वरूप डावखरे , निखिल देशमुख ,प्रशांत पाटील , अंकिता पाटील ,हेमंत पाटील , सोमनाथ चौधरी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

*