खडसेंना अडचणीत आणणाऱ्या हॅकर मनिष भंगाळेला बेड्या

0

जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे दाऊदशी संबंध असून त्यांच्या संभाषणाची क्लिप व्हायरल करून खळबळजनक आरोप करणारा हॅकर मनिष भंगाळेला गुन्हे शाखेकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

भंगाळेने केलेल्या आरोपांची चौकशी पोलीस करत असून याच प्रकरणात पोलिसांनी आता मनिष भंगाळेला अटक केली आहे.

मनिष भंगाळे या हॅकर्सने दाऊदचे कॉल ट्रेस केल्याचा दावा केला होता. भंगाळेनेच 2014 ते 2015 दरम्यान हॅकिंग करुन दाऊदने कुणा-कुणाला कॉल केले होते याची माहिती बाहेर आणली होती. त्यात आढळलेल्या 4 क्रमांकात एक नंबर खडसेंचा आहे असा दावा केला जात होता.

याप्रकरणी अनेक दिवसांपासून मनीष भंगाळेची चौकशी करण्यात येत असून अखेर आज त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

1 COMMENT

  1. मनिश भन्गालेला का पकडुन नेले याचा स्पश्ट उल्लेख बातमीत केला नाही आहे

LEAVE A REPLY

*