Type to search

नंदुरबार

हुतात्मा शिरीषकुमार ट्रस्टतर्फे आज तेजस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान

Share

नंदुरबार | नंदुरबार हुतात्मा शिरीषकुमार मेहता एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट सुरत आणि श्री संकष्टा देवी ट्रस्ट नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी उत्तीर्ण शहरातील तेजस्वी, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान समारंभ उद्या दि. २५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे .

यावर्षी शहरातील इयत्ता दहावी आणि बारावीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसेविका समितीच्या नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख सौ.स्मिता वावदे उपस्थित राहतील तर प्रमुख पाहुणे म्हणून शहीद शिरीषकुमार मेहता एज्युकेशन व चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा सुरत एज्युकेशनचे सेक्रेटरी नितीनभाई मेहता, कर सल्लागार संतोष नानकाणि उपस्थित रहातील.

सन्मान समारंभ उद्या दि.२५ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता लोकमान्य टिळक वाचनालयाच्या सभागृहात होईल. विद्यार्थी व पालकांनी सन्मान सोहळ्यास उपस्थित राहण्याची विनंती संकष्टादेवी ट्रस्ट आणि हुतात्मा शिरीषकुमार मेहता ट्रस्ट यांच्यातर्फे राजेंद्र बर्‍हाणपूरकर, दीपक आर्य, महादू हिरणवाळे यांनी केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!