हुडको कर्जाबाबत निर्णयाची शक्यता

0
जळगाव । दि 13 । प्रतिनिधी-हुडको कर्जाच्या एकरकमी परतफेडीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने नागरीहित लक्षात घेवुन तोडगा काढण्यासाठी बैठक घ्यावी असे आदेश दिले होते.
त्यानुसार उद्या दि.14 रोजी दुपारी 4.30 वाजता मंत्रालयात बैठक होणार आहे. मुख्यंमत्र्यांनी स्वतः केंद्रीयमंत्री व्यंकय्या नायडू यांच्याशी याबाबत चर्चा केली होती. त्यामूळे निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तत्कालीन जळगाव नपाने हुडकोकडून 141 कोटी 32 लाखाचे कर्ज घेतले होते. मनपाची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे काही हप्ते थकल्याने हुडकोने डीआरटीत धाव घेतली होती.
डीआरटीने 341 कोटीची डीक्री नोटीस मनपा प्रशासनाला बजाविली होती. तसेच तब्बल 50 दिवस मनपाचे बँक खाते देखील सिल केले होते.
त्यामुळे महानगरपालीकेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर डीक्री नोटीसला स्थीगिती मिळाली होती. तसेच दरमहा हुडकोला 3 कोटी अदा करण्याचे आदेश देखील उच्च न्यायालयाने दिले होते.

परंतू मनपा प्रशासनाने 141 कोटी 32 लाख कर्जापोटी 297 कोटी हुडकोला अदा केल आहेत. तसेच 2004 च्या रिशेड्युलींगनुसार 223 कोटी अपेक्षीत असतांनाही 236 कोटी हुडकोला अदा केले आहेत.

त्यामुळे मनपा प्रशासनाने दरमहा 3 कोटी हप्ता अदा करण्यास स्थगिती मिळावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

तसेच एकरकमी कर्जफेडीबाबत निर्णय घ्यावा यासाठी शासनाने हुडकोला विनंती केली होती. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने शासन, हुडको आणि मनपा प्रशासन यांनी समन्वय साधुन बैठक घ्यावी, अशी सुचना केली होती.

त्याअनुषंगाने उद्या दि.14 रोजी मंत्रालयात बैठक होणार आहे. या बैठकीला शासनाचे अधिकारी, हुडकोचे अधिकारी आणि मनपा आयुक्त जीवन सोनवणे उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

*