हुडकोच्या कर्जफेडीच्या हप्ताला स्थगिती मिळावी मनपाची न्यायालयात याचिका

0

जळगाव |  प्रतिनिधी :  मनपाने हुडको कडून घेतलेल्या कर्जाची रक्कम व्याजासहीत आता पर्यंत कर्जाच्या फेडीपेक्षा जास्त भरली आहे. यासाठी डीआटी, डीआरएटीमध्ये अजून हुडकोने कर्जची आकडेवारी दिली नसल्याने हुडकोला देण्यात येणार्‍या दर महिन्याच्या ३ कोटी ७५ लाख रुपयांचा हप्त्याला स्थगिती मिळावी यासाठी महापालिकेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

घरकुलसाठी तत्कालीन महापालिकेने हुडकोकडून १४० कोटी ३८ लाखाचे कर्ज घेतले होते. मनपाने घेतलेल्या कर्जाची परतफेड करीत असतांना मनपाने आतापर्यंत २७३ कोटी २१ लाखाच्या वर रक्कम हुडकोला भरली आहे. दरम्यान  डीआरटीने यासंदर्भात मनपाला ३४० कोटी ७४ लाखांची डिक्री नोटीस बजावली आहे. दरम्यान मनपाकडून हुडकोला एकरकमी कर्जफेडीचा प्रस्ताव सादर केला आहे.

मनपाने हुडकोला आतापर्यंत भरलेल्या हप्तांचा सीए अनिल शहा यांनी  याबाबत पडताळणी केल्या नंतर यामध्ये कर्जाची रक्कम दि.४ ऑक्टोंबर २०१५ मध्येच हुडकोला व्याजासहित संपुर्ण रक्कम भरली गेली असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच महापालिकेने आतापर्यंत जवळपास ४० कोटी पर्यंत अतिरिक्त रक्कम भरलेली असल्याचे दिसून येत आहे.

परंतू डीआरएटी, डीआरटी मधे हुडकोने अद्याप मनपाने भरलेले हप्तांची माहिती देण्यात आली नसल्याने आयुक्त जीवन सोनवणे यांनी हुडाकोचा हप्ताला स्थगिती मिळावी यासाठी उच्च न्यायालयात धाव घेवून याचिका दाखल केली आहे.

LEAVE A REPLY

*