हुंडा घेणार नाही; नगरकरांनी घेतली शपथ

0

बाळासाहेब पवार यांचा पुढाकार

अहमदनगर (प्रतिनिधी) – हुंडा घेणे-देणे या समाजातील अनिष्ठ प्रथेला लगाम घालण्याची वेळ आली आहे. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्याला मुलींच्या लग्नाची ऐपत नसल्याचे कारणही पुढे येत आहे. मराठवाड्यातील आत्महत्यांचे लोन आता नगरपर्यंत पोहचले आहे. यासाठी नगरकरांनी वेळीच सावध होऊन हुंडा घेणे आणि देणे या विरोधात लढा उभारण्याचा वेळ आली आहे. 1 मे ला नगरमधील ओम मंगल कार्यलयात शेकडो नगरकरांनी हुंडा न घेण्यची शपथ घेतली.
उद्योजक बाळासाहेब पवार यांच्या संकल्पनेतून हुंडा घेणे-देणे विरोधात नगरमध्ये चळवळ उभी राहत आहे. या चळवळीला राजकीय, सामाजिक, नोकरदार, व्यवसायिक, कष्टकरी, शेतकरी अशा सर्वच स्तरातून व्यापक पाठींबा मिळत आहे. सोमवारी 1 मे रोजी नगरमध्ये झालेल्या हुंडाला विरोध करण्यासाठी ‘हुंडा विरोधी शपथ’च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. संग्राम जगताप, महापौर सुरेखा कदम, अ‍ॅड. शिवाजी कराळे, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, संभाजी पवार, साहित्यिक डॉ. संजय कळमकर, सुनिता बागडे, माजी महापौर शिला शिंदे, जंगमदेवा, रावसाहेब कांबळे, डॉ. छाया बंडगळ, माया जगताप यांच्यासह शेकडो नगरकर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितींनी लग्न हे पवित्र बंधन आहे. कुटूंब व्यवस्थेचा भक्कम पाया असून, संस्कार व संस्कृतीचे लेणे आहे. लग्नसंस्थेतून आई या उद्दात व पवित्र नात्याचा उगम होतो. तसेच लग्न हा व्यवहार नाही, व्यवसायही नाही आणि सौदेबाजी नाही, त्याच प्रमाणे गुलामांच्या विक्रीसारखा बाजारही नाही यामुळे या पुढे लग्न समारंभात हुंडा घेणारही नाही व देणारीही नाही, अशी प्रतिज्ञान नगरकरांनी घेतली.

LEAVE A REPLY

*