हिट होण्यासाठी मला कुठल्याही सुपरस्टारची गरज नाही : आलिया भट्ट

0

‘मुझे हिट होने के लिए किसी सुपरस्टार की जरूरत नहीं…’ असे आलिया भट्टचे म्हणणे आहे.

आलिया सध्या मेघना गुलजारच्या  ‘राझी’ या चित्रपटात बिझी आहे. यात आलियाच्या अपोझिट विकी कौशल आहे.

आलियाने यापूर्वी शाहरूख खान, शाहिद कपूर अशा सुपरस्टारसोबत काम केले आहे.

अशात आलियाने विकी कौशलसोबत काम करणे, सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देऊन गेले. अलीकडे आलियाला याचबद्दल विचारण्यात आले. विकी कौशलसोबत काम करण्याचा निर्णय सोपा होता की कठीण? असा प्रश्न तिला केला गेला. यावर आलिया म्हणाली, विकी कौशल माझ्यापेक्षा कित्येकपट अधिक प्रतिभावान अभिनेता आहे.

कुणाला कमी लेखण्याचा प्रश्नच नाही. कारण आम्ही सगळे इथे स्वत:तील सर्वोत्तम देण्यास आलो आहोत. आपला येणारा चित्रपट आधीच्या चित्रपटापेक्षा अधिक चांगला असावा, असे इंडस्ट्रीतील सगळ्यांनाच वाटते, असे ती म्हणाली.

 

LEAVE A REPLY

*