हिंगोणे येथे पतीनेे केला पत्नीचा खून

0

फैजपुर |  वार्ताहर :  पतीने दारुच्या नशेत पत्नीशी वाद झाल्याने पतीने पत्नीस लाकडी दांडक्याने व रबरी पट्याने दोन्ही पायाच्या गुडघ्यावर व तिच्या गुप्तांगावर चेहेर्‍यावर जबर मारहाण केल्याने ५० वर्षाच्या दुधाबाई बारेल हिस जिवे ठार केल्याची घटना दि. १३ मार्च रोजी १० वाजेच्या सुमारास घडली.

सदरची घटना ही हिंगोणे येथील शेतात राहत असलेल्या ठिकाणी घडली. १३ मार्च रोजी धुलीवंदनाच्या दिवशी हिंगोणे येथे रात्री १० वाजेच्या सुमारास शेतमालक किशोर वारके यांच्या शेतातील खळ्यातील दुधाबाई जवानसिंग बारेला व तिचा पती जवानसिंग नारसिंग बारेला रा. निळड्या हे ५ मुली व ४ मुलांचा असा ९ पोरांचा बाप याने दारुच्या नशेत त्याची पत्नी दुधाबाई जवानसिंग बारेल वय ५० हिस लाकडी दाडक्याने तसेच रबरी पट्याने जबर मारहाण गडघ्यावर व गुप्तांगावर चेहर्‍यावर मारहाण करुन तिला ठार केले.

जवानसिंग बारेल याने पत्नीला ठार करुन रात्रीच हिंगोणे वरुन फैजपुर पोलिस स्टेशनचा रस्ता धरुन तो स्वत:ह फैजपुर पो. स्टेशनला हजर झाला या बाबत पो. पाटील दिनेश जगन्नाथ बाविस्कर यांनी फिर्याद दिल्यावरुन फैजपुर पो. स्टेशनला भाग ५ गुन्हा रजि. २१/२०१७ भादवी ३०२ प्रमाणे दाखल झाला असुन ए. पी. आय सादीक नेहेते  पुढील गुन्ह्याचा तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

*