‘हा विजय तुमच्यासाठीच!’; कोहली, डीव्हिलियर्सचा भावनिक संदेश

0
बंगळुरू । बंगळुरूच्या संघाने कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर अखेर यंदाच्या हंगामातील पहिलावहिला विजय मिळवला. 174 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूने पंजाबला 8 गडी आणि 4 चेंडू राखून पराभूत केले. या विजयाबरोबर बंगळुरूने अखेर खझङ 2019 च्या गुणतालिकेत आपले खाते उघडले. या विजयनानंतर विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स त्या दोघांनी चाहत्यांना एका व्हिडिओतून भावनिक संदेश दिला आहे.

आम्ही सलग सहा सामने पराभूत झालो, पण चाहत्यांनी आमच्यावरील विश्वास अजिबात कमी होऊ दिला नाही. आम्ही काही सामने अगदी कमी फरकाने पराभूत झालो. त्यामुळे काही वेळा आम्हालादेखील वाईट वाटले होते. पण चाहत्यांनी हार मानली नाही, आणि अखेर आम्ही शनिवारी पहिला सामना जिंकला.

हा विजय आमच्या चाहत्यांना समर्पित आहे. असा भावनिक संदेश त्यांनी चाहत्यांना दिला. दरम्यान, 174 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पार्थिव पटेलने 4 चौकार लगावत दणकेबाज सुरुवात केली होती. पण मोठा फटका खेळताना तो झेलबाद झाला. त्याने 9 चेंडूत 19 धावा केल्या. बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने चौकार षटकारांची आतषबाजी करत दमदार अर्धशतक केले.

LEAVE A REPLY

*